Today’s gold-silver prices : सोने महागले, चांदी स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

आज सोन्याचे दर वाढले असून, चांदी स्वस्त झाली आहे. नव्या दरानुसार 22 कॅरट सेन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Today's gold-silver prices : सोने महागले, चांदी स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव
आजचे सोन्याचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 12:28 PM

मुंबई : आज सोन्याच्या दरात (gold rate) तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदी (silver) स्वस्त झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,700 रुपये एवढे आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,950 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,300 इतके होते. त्यामध्ये आज तोळ्यामागे 400 रुपयांची वाढ झाली आहे. तर गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका होता. 24 कॅरट सोन्याच्या दरात आज 440 रुपयांची वाढ होऊन ते 50,950 रुपये झाले आहेत. एकीकडे सोन्याच्या दरात आज तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदीचे दर (silver rate) मात्र स्वस्त झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 65,000 रुपये इतके होते. मात्र आज चांदीमध्ये किलोमागे 3 हजार 300 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे दिवसांतून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच सोन्याचे दर जाहीर केले जातात. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी, त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

प्रमुख महानगरातील सोन्याचे दर

आज जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या दरानुसार सोने महाग झाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे. सध्या देशात सर्वाधिक महाग सोने हे चेन्नईमध्ये आहे. चेन्नईत एक तोळा 22 कॅरट सोन्यासाठी 47,860 रुपये तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 52,210 रुपये मोजावे लागत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

  1. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्याची उपराजधानी नागूपमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,760 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,010 रुपये इतका आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे.
  3. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,760 रुपये इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,010 रुपये इतका आहे.
  4. नाशिकमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 46,760 आणि 51,010 रुपये इतका आहे.
  5. आज चांदी स्वस्त झाली असून चांदीच्या दरात किलोमागे 3 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 61,700 रुपये इतका आहे.
Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.