या दोन बँकाबाबत मोठा निर्णय, RBI चीही मंजुरी, तुमचं खातं आहे का? जाणून घ्या

भारतीय रिझर्व्ह बँकेने एमिरेट्स NBD बँकेच्या भारतातील तीन शाखांचे RBL बँकेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 1 डिसेंबर 2026 पासून हा निर्णय लागू होईल. यामुळे मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथील शाखा RBL बँकेच्या म्हणून काम करतील. तुमच्या खात्यावर आणि बँकिंग सेवांवर काय परिणाम होईल, याची माहिती जाणून घ्या.

या दोन बँकाबाबत मोठा निर्णय, RBI चीही मंजुरी, तुमचं खातं आहे का? जाणून घ्या
reserve bank of india
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 10:06 PM

RBL Bank-Emirates NBD Bank Merger : बँकिंग सेक्टरशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 16 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज एमिरेट्स एनबीडी बँक (Emirates NBD Bank) च्या भारतातील तीन शाखांच्या आरबीएल बँक (RBL Bank)मध्ये विलिनीकरणास मंजुरी दिली आहे. हा निर्णय 1 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथील एमिरेट्स एनबीडी येथील शाखा आरबीएल बँकच्या शाखा म्हणून काम करणार आहेत.

जून 2026मध्ये यूएई बँकिंग ग्रुप एमिरेट्स एनबीडीने आरबीएल बँकेत 60 टक्के भागिदारी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता दोन्ही बँकांचे भारतीय ब्रँचेसमध्ये विलिनीकरण झाल्याने व्यवहाराचा पुढचा टप्पाही पूर्ण झाला आहे. या बँकांचे खाते, व्यवहार आणि दुसऱ्या बँकिंग सेवांवर या विलिनीकरणाने काय परिणाम होईल, असा सवाल ग्राहकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. त्यावरच टाकलेला हा प्रकाश.

Loading...

1. RBI कडून 1 डिसेंबर निश्चित

भारतीय रिझर्व्ह बँकेने एमिरेट्स एनबीडी बँकेच्या भारतीय शाखांना आरबीएल बँकमध्ये विलिन करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या कलम 44A(4) च्या अंतर्गत देण्यात आली आहे. RBI च्या निर्णयानुसार, 1 डिसेंबर 2026 पासून एमिरेट्स एनबीडीच्या भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व शाखा आरबीएल बँकेच्या ब्रँच म्हणून काम करतील. त्यामुळे दोन्ही बँकांना भारतीय व्यवसायात एकत्र आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

2. 26,000 कोटींची गुंतवणूक

एमिरेट्स एनबीडीने 18 जून 2026 रोजी RBL बँकेतील आपल्या बहुमताची भागिदारी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे बँकेने सुमारे 2.75 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 26,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर आरबीएल बँकेची वाढलेली शेअर गुंतवणूक एमिरेट्स एनबीडीच्या भागिदारीच्या 60 टक्के झाली आहे. या व्यवहाराची घोषणा सर्वात आधी 18 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली होती. याच्या अंतर्गत एमिरेट्स एनबीडीने नवीन शेअर खरेदी करून आरबीएल बँकेत आपली भागिदारी वाढवली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RBL Bank मध्ये भागिदारी खरेदी करणं आणि एमिरेट्स एनबीडीचे भारतीय शाखांमध्ये विलय होणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. हिस्सेदारी खरेदीचं काम जूनमध्ये पूर्ण झालं होतं. तर शाखांचं विलिनीकरण डिसेंबरपासून लागू करण्यात आलं आहे.

3. मुंबई, चेन्नई आणि गुरुग्रामच्या शाखांचा समावेश

एमिरेट्स एनबीडी भारत सध्या तीन शाखांच्या माध्यमातून काम करत आहे. मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथे या शाखा आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने 20 जानेवारी 2026 रोजी याच्या प्रस्तावित व्यवहाराला मंजुरी दिली होती. यात एमिरेट्स एनबीडीच्या भारतीय शाखांना आरबीएल बँकमध्ये विलय करण्याची योजना होती. आरबीआयच्या मंजुरीनंतर या तिन्ही शाखांचे व्यवहार आरबीएल बँकेच्या अंतर्गत आले आहेत. 1 डिसेंबरपासून या तिन्ही ब्रँच आरबीएल बँक म्हणून काम करणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us