AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर वाचले असते… वर्षा उसगांवकर यांचा सर्वात मोठा दावा

अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, जर नानांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर कदाचित ते आज आपल्यात असते. त्यांनी नानांच्या अभिनयाचे कौतुक केले, तिरंगा चित्रपटातील आठवणी जागवल्या.

Nana Patekar : नाना पाटेकर वाचले असते... वर्षा उसगांवकर यांचा सर्वात मोठा दावा
Nana PatekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 9:38 PM
Share

अभिनेता नाना पाटेकर यांचं अचानक निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नाना गेल्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनीही नानाच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र, नानांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले असते तर ते वाचले असते, अशी प्रतिक्रिया वर्षा उसगांवकर यांनी व्यक्त केली आहे.

IANS शी संवाद साधताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हा दावा केला आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना गेले. जणू काही एका युगाचा अंत झाला, असंच वाटतंय, असं सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यांना अश्रू आवरणेही कठिण झाले. आज मेडिकल सायन्स कुठंच्या कुठं गेलं आहे. लोक 100 वर्ष जगत आहेत. 75 वर्ष हे काही जग सोडून जाण्याचं वय नाही. जर नानांना वेळेतच उपचार मिळाले असते तर कदाचित ते आज आपल्यात असते, असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या. नानांसोबत घालवलेले क्षण आजही स्मरणात आहेत, असं त्या म्हणाल्या.

त्यांच्यासोबत काम करणं हे भाग्यच

तिरंगात नानांसोबत काम करायला मिळालं हे माझं भाग्यच समजते. नानांनी त्यांचा दमदार अभिनय, बुलंद आवाज आणि प्रत्येक भूमिकेत घुसण्याची त्यांची पद्धत यामुळे त्यांचा अभिनय एका उंचीवर जायचा. त्यांनी कॉमेडीपासून नायकांपर्यंत आणि खलनायकापर्यंत प्रत्येक भूमिकेतून आपली छाप सोडली, असं त्यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांचं कोणत्या सिनेमातील काम सर्वाधिक आवडलं असं विचारलं तेव्हा वर्षा उसगांवकर यांनी तिरंगा हा सिनेमा सांगितलं. त्यांच्या मते, तिरंगा सिनेमातील त्यांची भूमिका अत्यंत चांगली झाली होती.

कसा झाला नानांचा मृत्यू

नाना पाटेकर यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर रोजी झाला. गोव्यातील आपल्या घरी असतानाच मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी दीडच्या सुमारास एका मित्राला फोनही केला. पण रात्रीची वेळ असल्याने मेसेज पोहोचला नाही. पहाटे जेव्हा मित्राने मेसेज पाहिला तेव्हा तो धावतच नानांच्या घरी आला. पण नाना जमिनीवर निपचित पडले होते. त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केलं होतं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा