AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं लाईटहाऊस मला सोडून गेलं…; रतन टाटांच्या 29 वर्षीय मित्राची भावनिक पोस्ट

Shantanu Naidu Instagram Post About Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यानंतर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. शांतनू नायडू याने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. यात शांतनूने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी...

माझं लाईटहाऊस मला सोडून गेलं...; रतन टाटांच्या 29 वर्षीय मित्राची भावनिक पोस्ट
शांतनूची रतन टाटांसाठी खास पोस्टImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 10, 2024 | 9:54 AM
Share

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर टाटा समुहातील कामगार आणि रतन टाटा यांचा तरूण जिवलग मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट लिहिली आहे. रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. अलविदा माझ्या लाईटहाऊसला…, अशी पोस्ट शांतनूने लिहिली आहे.

रतन टाटा आणि शांतनूचं नातं

रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री खूपच खास होती. वयात 55 वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनूमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. रतन टाटा यांचा 84 वा वाढदिवस शांतनू नायडूसोबत साजरा केला होता. शांतनूने आणलेला केक रतन टाटा यांनी कापत लाडक्या मित्रासोबत वाढदिवस साजरा केला.

टाटा समुहाची सर्वात स्वस्त कार असलेल्या नॅनो कारने रतन टाटा एकदा ताज हॉटेलला गेले होते. तेव्हा या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली होती. यावेळी रतन टाटा यांची कार शांतनू नायडू चालवत होता. रतन टाटा आणि शांतनू हे दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत असत.

कशी झाली शांतनू आणि रतन टाटा यांची ओळख?

पुण्यातील तेलगू कुटुंबामध्ये 1993 ला शांतनूचा जन्म झाला. त्याला कायम काही वेगळं करण्याची आवड होती. शांतनूच्या मोटोपज या संस्थेने रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी विशेष डेनिम कॉलर बनवली. ज्यावर रिफ्लेक्टर लागला होता. जेव्हा गाडी समोरून येईल. तेव्हा त्या डेनिम कॉलरवर रिफ्लेक्ट होतील आणि त्यातून त्या श्वानांचा प्राण वाचेल, अशी या मागची शांतनूची संकल्पना होती. याच डेनिम रिफ्लेक्टर कॉलरमुळे रतन टाटा आणि शांतनूची भेट झाली. रतन टाटा यांना शांतनूची ही संकल्पना आवडली. इथूनच रतन टाटा आणि शांतनूच्या मैत्रीला सुरुवात झाली. या दोघांमधील नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं. 55 वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनू या दोघांमधील मैत्री कायम वृद्धिंगत होत राहिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...