AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Live | शेअर बाजारात पडझड सुरुच, सेन्सेक्स तब्बल 2900 अंकांनी गडगडला

भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Share Market Sensex  live update) तब्बल 2500 अंकांनी कोसळला.

Share Market Live | शेअर बाजारात पडझड सुरुच, सेन्सेक्स तब्बल 2900 अंकांनी गडगडला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 12, 2020 | 5:37 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूचा कहर जगभरातील शेअर मार्केटमध्ये (Share Market Sensex  live update) सुरुच आहे. भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल 2900 अंकांची घसरण होऊन तो 32,778 अंकावर बंद झाला. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Share Market Sensex  live update) तब्बल 2500 अंकांनी कोसळला. बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली. त्यामुळे निर्देशांक 33 हजार 200 अंकांपर्यंत कोसळला. बाजारात आज दिवसाची सुरुवात 1700 अंक कोसळून झाली. तर निफ्टीतही 500 अंकांची घसरण पाहायला मिळाली. पुढे यामध्ये आणखी वाढ होत गेली आणि एकावेळी निर्देशांक 2500 अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्याआधी बुधवारी सेन्सेक्स 35,697 आणि निफ्टी 10,458 अंकांवर बंद झाली होती.

त्यानंतर आज बाजाराला सुरुवात होताच, गडगडाट पाहायला मिळाला. मोठमोठे शेअर्स धाडकन आपटल्याने बाजार कोसळला.

भारतीय शेअर मार्केटप्रमाणे अमेरिका मार्केटही 1400 अंकांनी घसरला. यादरम्यान रुपयाही 68 पैशांनी घसरुन त्याचं मूल्य 74.32 रुपये प्रति डॉलर इतकं झालं. 11 ऑक्टोबर 2018 नंतर पहिल्यांदाच रुपया इतका घसरल्याचं पाहायला मिळालं.

YES बँकेचे शेअर 15 टक्क्यांनी घसरले

रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या YES बँकेचे शेअर्सचीही पडझड झाली. सुरुवातीला YES बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरुन 24 रुपयांवर पोहोचले. गेल्या 2 दिवसात YES बँकेचे शेअर्स जवळपास 70 टक्क्यांनी घसरले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...