SHARE MARKET: बजेट इफेक्ट नगण्य, 6 लाख कोटी रुपयांवर पाणी; गुंतवणुकदारांनो उचला ‘हे’ पाऊल

| Updated on: Feb 08, 2022 | 10:17 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयक धोरण उद्या (बुधवारी) सादर करणार आहेत. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेपो किंवा रिव्हर्स रेपो स्थिर राहणार की बदलणार याकडे अर्थजगताच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केला आहे.

SHARE MARKET: बजेट इफेक्ट नगण्य, 6 लाख कोटी रुपयांवर पाणी; गुंतवणुकदारांनो उचला ‘हे’ पाऊल
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (India Stock Market) घसरणीचे सत्र कायम आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेंसेक्समध्ये (Sensex) 1700 अंकांची घसरण नोंदविली गेली. घसरणीमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 6.23 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अर्थक्षेत्रातील जाणकरांच्या माहितीनुसार, अमेरिका बॉन्ड यील्डच्या वाढीमुळे विदेशी गुंतवणुकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत आहेत. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयक धोरण (MONETARY POLICY) उद्या (बुधवारी) सादर करणार आहेत. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेपो किंवा रिव्हर्स रेपो स्थिर राहणार की बदलणार याकडे अर्थजगताच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केला आहे.

अर्थसंकल्पातील घोषणांचा प्रभाव मार्केटवर अधिक काळ टिकला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच मार्केट स्थिरस्थावर झाले आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी (1 फेब्रुवारी) बाजारात तेजी दिसून आलं. त्यानंतर 2 फेब्रुवारी पासून सेंसेक्स आणि निफ्टी मध्ये घसरणीचं सत्र सुरूच आहे. या कालावधीत सेंन्सेक्समध्ये 1700 अंकांची घसरण नोंदविली गेली. बीएसई वर सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांची शेअर वॅल्यू 2,70,64,905.75 कोटी रुपये होती. यामध्ये घसरण होऊन शेअर वॅल्यू 2,64,41,631.88. कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

शेअर बाजारात सेक्टर निहाय घसरणीचे चित्र दृष्टीक्षेपात

• रिअल्टी इंडेक्स (-9.5 टक्के)
• मीडिया (-5 टक्के)
• आयटी इंडेक्स (-6 टक्के)
• ऑटो (-3.5 टक्के)
• हेल्थ (-3.1 टक्के)
• एफएमसीजी (-.2.8 टक्के)

शेअरनिहाय घसरणीचे चित्र दृष्टीक्षेपात

• HDFC (-7.5 टक्के)
• SBI लाईफ (-6.8 टक्के)
• बजाज फिनसर्व (-6.20 टक्के)
• एल अँड टी (-6.20 टक्के)
• कोटक बँक (-6.10 टक्के)
• ब्रिटानिया (-6 टक्के)

गुंतवणुकदारांचं तळ्यात, मळ्यात!

एस्कॉर्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी टीव्ही 9 हिंदीशी बोलताना शेअर बाजारातील घसरणीला वाढत्या दरवाढीची कारणे सांगितली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर मार्केटची दिशा स्पष्ट होईल. व्याज दरात वाढ केल्यास घसरण नोंदविली जाऊ शकते. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, गुंतवणुकदारांनी घसरणीवेळी खरेदी करायला हवी. गुंतवणुकदारांना एसआयपी खरेदी करायला हवी.

बजेट इफेक्ट नगण्य?

अर्थसंकल्पातील घोषणांचा प्रभाव मार्केटवर अधिक काळ टिकला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच मार्केट स्थिरस्थावर झाले आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प 2021 दिवशी सेंन्सेक्स मध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. पुढील सहा दिवसांपर्यंत तेजी टिकून राहिली. 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत मार्केट पुन्हा स्थिरस्थावर झाले. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अवघ्या दोन दिवसांत मार्केट स्थिरस्थावर झाल्याचं चित्र दिसून आलं आहे.

इतर बातम्या :

SHARE MARKET: शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, बाजार पडझडीनंतर सावरला; सेंन्सेक्स 187 अंकांनी वधारला

GOLD PRICE TODAY: पडझडीनंतर सोने बाजार सावरला, महाराष्ट्रात सोनं महाग, वाचा आजचे भाव

डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला झटका, कर्जदाते लटकले, पैसे मिळण्यास विलंब होणार?