AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SHARE MARKET: शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, बाजार पडझडीनंतर सावरला; सेंन्सेक्स 187 अंकांनी वधारला

आज (मंगळवारी) सेंसेक्स (Sensex) 187 अंकांच्या वाढीसह 57,808 वर आणि निफ्टी 53 अंकांच्या वाढीसह 17267 वर बंद झाला.

SHARE MARKET: शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, बाजार पडझडीनंतर सावरला;  सेंन्सेक्स 187 अंकांनी वधारला
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 9:06 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. आज (मंगळवारी) सेंसेक्स (Sensex) 187 अंकांच्या वाढीसह 57,808 वर आणि निफ्टी 53 अंकांच्या वाढीसह 17267 वर बंद झाला. स्मॉल कॅप गुंतवणुकदारांची मोठी निराशा झाली (Smallcap stocks). गुंतवणुकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला. उर्जा क्षेत्रातील निर्देशांकात मोठी घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे मेटल आणि सरकारी बँकांच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. गेल्या तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अर्थजगातील घडामोडींचा भारतीय शेअर (Indian share market) बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून येत होता. सेंन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली होती. काल (सोमवारी) सेंन्सेक्स 1024 अंकांच्या घसरणीसह 57,621 वर बंद झाला. तर निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 17214 वर पोहोचला होता.

आजचे तेजीचे शेअर्स

• टाटा स्टील (3.09) • डिव्हिज लॅब्स (1.81) • बजाज फायनान्स (1.79) • बजाज फिनसर्व्ह (1.77) • रिलायन्स (1.68)

आजचे घसरणीचे शेअर्स

• ओएनजीसी (-1.99) • पॉवग ग्रिड कॉर्प (-1.68) • आयओसी (-1.26) • एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-1.12) • टाटा कॉन्स प्रॉडक्ट (-1.09)

गुंतवणुकदारांचे ‘आस्ते कदम’!

अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला होता. शेअर बाजार अर्थसंकल्पानंतर अवघ्या दोनच दिवसात स्थिरस्थावर झाल्याचं चित्र निर्माण झालं. प्रमुख वित्तीय संस्थांचे आर्थिक तिमाही अहवाल (Q3 Results) पटलावर येत असल्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे धोरण स्विकारले आहे.

आरबीयकडून दिलासा की स्थिरता?

अर्थसंकल्पातील घोषणांचा किंवा तरतुदींचा प्रभाव उद्योगजगतावर अल्पकाळ टिकला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच बाजारात पडझड नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीची बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्या (बुधवारी) चलनविषयक धोरण घोषित केले जाणार आहे. अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण स्थिर राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिव्हर्स रेपो दरात घट आणि रेपो दर स्थिर अशी शक्यता अर्थवर्तृळाने वर्तविली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत चलबिचल निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

इतर बातम्या

GOLD PRICE TODAY: पडझडीनंतर सोने बाजार सावरला, महाराष्ट्रात सोनं महाग, वाचा आजचे भाव

डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला झटका, कर्जदाते लटकले, पैसे मिळण्यास विलंब होणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.