UPI चा वापर करणाऱ्या छोट्या दुकानदारांना मिळणार कर्ज, कशी आहे नेमकी योजना?

UPI चा वापर करणाऱ्या छोट्या दुकानदारांना आता कर्ज मिळू शकते. यासाठी आता एसबीआय ही एक योजना आखत आहे.

UPI चा वापर करणाऱ्या छोट्या दुकानदारांना मिळणार कर्ज, कशी आहे नेमकी योजना?
Small shopkeepers
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 12:28 PM

देशातील छोट्या दुकानदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एसबीआय बँक आता छोट्या दुकानदारांच्या यूपीआय व्यवहारांच्या डेटाचा वापर करणार आहे. या डेटाचा वापर करून एसबीआय नवीन सिस्टिम विकसित करत आहे. एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या डेटामुळे दुकानदारांना कर्ज सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

एसबीआयच्या मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी कुमार तिवारी यांनी मुंबईतील आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत म्हटलं की, एखाद्या व्यवसायात सातत्याने विक्री होत असेल, तर जीएसटीला पर्याय म्हणून यूपीआयच्या व्यवहारांच्या वापर केला जाऊ शकतो’. तिवारी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अश्विनी कुमारी यांनी म्हटलं की, आम्ही जीएसटी नोंदणी न करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी एक सिस्टिम तयार करत आहे. या सिस्टिमचा वापर त्यांना करता येईल. तसेच जीएसटी नोंदणी असलेल्या व्यावसायिकांना कर्ज देण्याचा प्रश्न बँकेने सोडवला आहे. आता व्यावसायिकाला अवघ्या 10 मिनिटांत कर्ज मिळू शकते, अशी स्थिती आहे. एसबीआयने मागील 18 महिन्यात जीएसटी आणि पॅनच्या आधारे 1लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. परंतु जीएसटी नंबर नसलेल्या व्यावसायिकांना कर्ज मिळणे कठीण जाते. अशावेळी पर्यायी डेटा महत्त्वाचा ठरणार आहे. यूपीआय व्यवहारावर तिवारी यांनी म्हटलं की, कर्ज देणाऱ्या बँकेकडे यूपीआय व्यवहाराविषयी माहिती नसते. परंतु व्यवहार करण्यास मदत करणाऱ्या पेमेंट अॅपजवळ ही संपूर्ण माहिती असते. तिवारी म्हणाल्या, ‘ग्राहकांच्या संमतीने बँक यूपीआय पेमेंट, टेलिकॉम कंपन्यांकडून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे कर्जपात्रतेचे मूल्यांकन करता येऊ शकते. या नवीन आकडेवारीच्या आधारे छोट्या व्यावसायिकांना कर्जाची उपलब्धता केली जाऊ शकते.

छोट्या दुकानदारांना मिळणार फायदा 

एसबीआयच्या नव्या योजनेमुळे छोट्या दुकानदारांना मोठा फायदा होऊ शकतो. छोट्या दुकानदारांना कर्ज मिळण्यात अडचणी कमी होतील. त्यामुळे जीएसटीधारका व्यावसायिकांसारखे आता छोट्या दुकानादारांनाही कर्ज मिळेल. परंतु आता एसबीआय ही योजना कधीपासून राबवणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us