AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shopping : सर्वात स्वस्त-मस्त 5 मार्केट, 50 रुपयांत जिन्स, 100 रुपयांत 4 शर्ट्स, महागडे ब्रँड मिळतात कवडीमोल भावात

Shopping : आता कॉलेज देखील सुरु झालेत आणि सण देखील जवळ येत आहेत. म्हणून शॉपिंगसाठी कुठे जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तर जाणून देशातील काही मार्केटे जेथे कवडीमोल भावात सर्वकाही मिळतं...

Shopping : सर्वात स्वस्त-मस्त 5 मार्केट, 50 रुपयांत जिन्स, 100 रुपयांत 4 शर्ट्स, महागडे ब्रँड मिळतात कवडीमोल भावात
| Updated on: Sep 02, 2026 | 1:53 PM
Share

Shopping : शॉपिंग करायला सर्वांना आवडतं. पण मोठे दुकान आणि मॉलमधून खरेदी करणं सर्वांच्या खिशाला पडवडणारं नव्हतं… त्यामुळे आपण स्वस्त मार्केटच्या शोधात असतो. जर तुम्हाला देखील कमी स्वस्त आणि मस्त शॉपिंग करायची असेल तर, देशात असे पाच मार्केट आहेत, जिथे लागणाऱ्या वस्तू कमी दरात मिळतात. या मार्केटमध्ये कपडे देखील तुम्हाला कमी दरात मिळतील. तर जाणून घ्या देशातील असे कोणते मार्केत आहेत, जिथे कमा दरात कपडे मिळतील.

मंगलदास मार्केट मुंबई : मुंबईतील मंगलदास मार्केट 100 वर्ष जुनं आहे. हे टेक्सटाईल मार्केट आहे. येथे सिल्क, कॉटन, ब्रोकेट, शिफॉन, नेट आणि सिंथेटिक फॅब्रिक सहज मिळतात. असं देखील म्हटलं जातं की, मुंबईतील अनेक लोक येथेच शॉपिंग करतात. येथे कपड्यांच्या सुरुवात 100 रुपयांपासून होते.

बडा बाजार, कोलकाता : बडा बाजारची सुरुवात 18 व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत झाली. येथे कपडे, कृत्रिम दागिने आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या वस्तू सहज उपलब्ध होतात. या बाजाराची माहिती असलेल्यांच्या मते, येथील कपडे किरकोळ दुकाने किंवा मॉल्सच्या तुलनेत 40% ते 70% स्वस्त असतात. बडा बाजारमध्ये ट्रेंडी कुर्तींची किंमत 55 ते 150 पासून सुरू होते, तर चांगल्या दर्जाच्या साड्या अवघ्या 200 रुपयांमध्ये मध्ये मिळू शकतात.

रिंग रोड मार्केट, सूरत : रिंग रोड येथे असलेलं मार्केट कोणत्याही एका विशिष्ट नावाने ओळखलं जात नाही; त्याऐवजी, ते अनेक मोठ्या व्यावसायिक संकुलांनी बनलेलं आहे जिथे हजारो दुकाने आहेत. हा मार्केट प्रामुख्याने साड्या आणि पारंपरिक कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला अवघ्या 100 रुपयांपासून उत्कृष्ट दर्जाच्या साड्या मिळू शकतात, तर लग्नासाठीचे लेहेंगे 1 हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. जर तुम्ही सुरतला जाण्याचा बेत आखत असाल, तर रिंग रोडवरील या कापड बाजाराला नक्की भेट द्या.

गांधी नगर मार्केट, दिल्ली : हा बाजारपेठ रेडिमेड कपडे आणि टेक्सटाइलसाठी आशियातील सर्वात मोठी होलसेल मार्केट म्हणून ओळखला जातो. येथे हजारो दुकाने आणि कपड्यांचे कारखाने आहेत. असं सांगितलं जातं की, मार्केटची स्थापना 1971 मध्ये झाली होती. विविध शहरांमधील व्यापारी प्रामुख्याने येथूनच आपला माल खरेदी करतात. किरकोळ विक्रीच्या बाबतीतही, येथे साधारणपणे 100 रुपयांना चांगल्या दर्जाचे कपडे मिळू शकतात.

सरोजिनी मार्केट, दिल्ली : स्वस्त आणि मस्त कपड्यांसाठी दिल्ली येथील सरोजिनी मार्केट प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला 100 रुपयांमध्ये 3 – 4 टीशर्ट मिळतात. शिवाय 50 रुपयांमध्ये जिन्स मिळते… कपड्यांशिवाय या मार्केटमध्ये घड्याळ, चष्मा, परफ्यूम, बूट… अशा अनेक वस्तू कमी दरात मिळतात. दिल्लीत राहणारा प्रत्येक व्यक्ती या मार्केटमध्ये शॉपिंगसाठी येथे येत असतो.

Follow Us
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल