Share Market: आरारारा खेला झाला, या 3 शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 1400 कोटींचा डाव लागला

Multibagger Stock: या तीन शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. बाजारातीत दिग्गज खेळाडूंनी या तीन स्टॉक्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. जवळपास 1400 कोटींचा डाव लागला आहे. कोणते आहेत हे स्टॉक?

Share Market: आरारारा खेला झाला, या 3 शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 1400 कोटींचा डाव लागला
स्टॉक मार्केट
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 03, 2026 | 3:26 PM

Multibagger Stock: शेअर बाजारात बल्क डील झाली आहे. याचा अर्थ काही गुंतवणूकदारांनी काही कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. एकगठ्ठा शेअर्सची खरेदी केली आहे. संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये ही खरेदी केली आहे. अर्थात ही मोठी खरेदी त्या कंपन्यांवरील विश्वासामुळे केली आहे. पण या तीन शेअर्सवरच गुंतवणूकदारांच्या उड्या का पडल्या याची चर्चा सुरू झाली आहे. या शेअर्सवर जवळपास 1400 कोटींचा डाव लागला आहे. कोणते आहेत हे शेअर्स?

Vishal Mega Mart – हा साखळी पुरवठादार, रिटेल मॉल आहे. इथे फॅशन, किराणा आणि घरगुती सामानाची विक्री होते. कंपनीचे मुख्य लक्ष टियर 2 आणि टियर 3 शहरातील मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गावर आहे. त्यांच्यासाठी कंपनीचा मोठा विस्तार होत आहे.

कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 54463.85 कोटी इतके आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर 117.50 रुपयावर व्यापार केला. मागील बंदपासून 117.80 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरने 12.69 कोटी शेअर 1485.1 कोटी रुपयांत खरेदी केले. मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूरने 7.32 कोटी शेअर 857.59 कोटीत खरेदी केले. या सर्व गुंतवणूकदारांना 117 रुपये प्रति शेअर भावाने खरेदी केले.

Gaudium IVF and Women Health- फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि महिलांच्या आरोग्यासाठी काम करणारी ही हेल्थकेअर कंपनी आहे. ही कंपनी आयव्हीफ प्रोसीजर, प्रजननसंबंधी सल्ला आणि इतर आरोग्य सेवा पुरवते. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 582.37 कोटी रुपये आहे. हा स्टॉक काल सोमवारी 82.01 रुपये ट्रेड करत होता.

या कंपनीत जीडीएन इनवेस्टमेटसने 20 लाख शेअर्समध्ये गुंतवणूक केली. कंपनीने 83.3 रुपये प्रति शेअरच्या भावाने 16.66 कोटींचे शेअर खरेदी केले. तर परम कॅपिटल कंपनीने 25 लाख शेअर 85.51 रुपयांच्या भावाने 21.37 कोटी रुपयात खरेदी केले. मिनर्वा इमर्जिंग ऑपर्च्युनिटीज फंडने 10 लाख शेअर 83 रुपयांच्या भावाने 8.3 कोटी रुपयांत विक्री केले. नियोमाईल इंडिया ऑपर्च्युनिटी फंडने 15.76 लाख शेअर 84.89 रुपयांच्या भावाने 13.38 कोटीत खरेदी केले.

Indian Railway Catering and Tourism Corporation- भारतीय रेल्वेची ऑनलाईन तिकिटींग, कॅटरिंग आणि टुरिझम शाखा असलेली IRCTC सध्या चर्चेत आहे. देशभरात ट्रेन तिकिटासाठी हा एक ऑनलाईन बुकिंगचा एकमात्र अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 45540 कोटी रुपये आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 568.95 रुपयांवर ट्रेड करत होता. BP Paribas फायनेन्शिअल मार्केट्सने आयआरसीटीसीमध्ये 47.33 लाख शेअर 569.91 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी केले. हा सौदा जवळपास 269.74 कोटी रुपयांचा आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us