Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या भविष्यासाठी खास सरकारी योजना! मुलीच्या खात्यात दरमहिने भरा फक्त 2, 000 रुपये, काही वर्षातच मिळतील 11 लाख रूपये
मुलीच्या जन्मानंतर तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता अनेक पालकांना सतावत असते.भविष्यात मोठा आर्थिक भार येऊ नये म्हणून आतापासून थोडी बचत केली किंवा सरकारच्या सुकन्या समृद्धीचा या योजनेचा लाभ घेतला तर भविष्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते.

मुलीच्या जन्मानंतर तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता अनेक पालकांना सतावत असते.भविष्यात मोठा आर्थिक भार येऊ नये म्हणून आतापासून थोडी बचत केली किंवा सरकारच्या सुकन्या समृद्धीचा या योजनेचा लाभ घेतला तर भविष्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते.
केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना एक मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेत मुलीच्या नावावर वेळीच थोडी थोडी बचत केल्यास काही कालानंतर तुम्हाला 11 लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कमेचा फायदा मिळू शकतो.
मुलगी जन्माला आल्यानंतर लगेच तिच्या नावाने सुकन्या समृद्धी खातं उघडलं आणि दर महिन्याला 2 हजार रूपये जमा केले. म्हणजे वर्षाला 24 हजार रूपये होतील या पद्धतीने सलग 15 वर्षे पैसे भरल्यास एकूण गुंतवणूक 3 लाख 60 हजार इतकी होते.
आणि ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी या योजनेवर 8.2 टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. हा दर संपूर्ण 21 वर्षे कायम राहिला. असं समजून केलेल्या गणनेनुसार मॅच्यूरिटीच्यावेळी सुमारे 11.09 लाख रूपये मिळू शकतात यामध्ये तुमची गुंतवणूक 3.60 लाख रूपये, तर अंदाजे 7.49 लाख रूपये व्याजाचा समावेश असेल.
या योजनेची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खातं उघडल्यानंतर फक्त 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात.त्यानंतर पुढील सहा वर्षे पैसे भरण्याची गरज नसते. मात्र खात्यातील रकमेवर व्याज मिळतं राहतं.
खातं उघडण्यासाठी मुलींच वय 10 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. पालक किंवा कायदेशीर पालक तिच्या नावाने हे खातं उघडू शकतात. एका आर्थिक वर्षात किमान 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करता येतात. एका कुटुंबात साधारण दोन मुलींसाठी ही खाती उघडता येतात. जुळ्या किंवा तिळ्या मुलींसाठी ही प्रक्रिया वेगळी असते.