AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप, अजित पवार गटाची मोठी प्रतिक्रिया, ‘ फक्त वल्गना…’

रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला," असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. 

रोहित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप, अजित पवार गटाची मोठी प्रतिक्रिया, ' फक्त वल्गना...'
| Updated on: Nov 16, 2026 | 6:41 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी: Anil Patil On Rohit Pawar PC:  आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन गंभीर आरोप केलेत. आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तो मफलर मॅन कोण? याबाबत खुलासा करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला.  मुख्यमंत्र्यांचा या अपघाताशी काही संबंध नाही, मात्र त्यांचे संबंध असल्यामुळेच व्हिएसआरला वाचवले जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, अनिल पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले अनिल पाटील?

“रोहित पवार हे वेगळ्या मूडमध्ये आणि वेगळ्या अँगलने आज पुन्हा महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांच्याकडून सरकारला तसेच मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या आरोपांच्या माध्यमातून रोहित पवार यांना एकच गोष्ट दाखवायची आहे की मी अजित पवारांच्या जवळचा तसेच त्यांच्यावर प्रेम करणारा एकमेव आहे,” असं आमदार अनिल पाटील म्हणालेत.

तसेच “ज्या फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी आरोप केला त्या देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांचे मैत्रीपूर्ण संबंध हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. प्रसिद्धी मिळवणे आणि राजकारण करणे एवढाच उद्देश त्यांचा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिसतो.  2019 मध्ये विधानसभेची निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी याच रोहित पवारांनी भाजपकडे आग्रही भूमिका घेतली होती, असे म्हणत  राज्याचे मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीच्या आरोप करणे अत्यंत चुकीचं आहे,” अशी टीकाही यावेळी अनिल पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, “तांत्रिक बाजू जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत गुन्हा कुणावर दाखल करायचा असा देखील प्रश्न असतो. रोहित पवार यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी तपास यंत्रणांकडे सादर करावं जेणेकरून तपास यंत्रणा देखील हातभार लागेल. अशा पद्धतीने माध्यमांसमोर येऊन रोहित पवार केवळ वल्गना करतात,” असा टोलाही अनिल पाटील यांनी लगावला आहे.

भाजपची पहिली प्रतिक्रिया! 

दुसरीकडे, रोहित पवार यांच्या आरोपावरुन भाजपनेही जोरदार टीका केली आहे. “रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व! आज स्व. अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा उपक्रम, दुसरे काहीही नाही. रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला,” असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!