Chanakya Niti: पती, पत्नीने या लोकांपासून कायम राहावे सावध, अन्यथा संसार होईल उद्ध्वस्त, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यापासून पती-पत्नीने कायम सावध राहावं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल सांगताना चाणक्य म्हणतात पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत, जोपर्यंत ही दोन्ही चाकं समान गतीने धावत आहेत, तोपर्यंत हा संसारूपी रथ धावत राहतो. परंतु त्यातील एका चाकाने जरी साथ सोडली किंवा एक चाक जरी मागं पडलं तर मात्र तुमचा संसार सुरळीत होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे समाजात असे देखील काही लोकं असतात अशा लोकांपासून पती-पत्नीने कायम सावध राहण्याची गरज असते, तुमची एक छोटीशी चूक देखील तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकते, चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
वाईट सवयी असलले लोकं – चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. काही लोकं हे चांगले असतात. जे आपल्या असण्याने इतरांच्या आयुष्यात देखील आनंद पेरतात. तुम्ही जर अशा लोकांच्या संगतीमध्ये असाल तर तुमचा संसार हा सुखाचा होतो. परंतु समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांना वाईट सवयी असतात, जर तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आलात तर मात्र तुमचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे आपला जोडीदार नेमका कोणाच्या संगतीमध्ये आहे? यावर देखील तुमचं लक्ष असलं पाहिजे, तरच तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो, असं चाणक्य म्हणतात.
चुगल्या करणारे लोकं – चाणक्य म्हणतात अशा लोकांपासून तर नेहमी सावध राहिलं पाहिजे, कारण असे लोक तुम्हाला काही तरी वेगळंच सांगतात. तुमच्या पतीला किंवा पत्नीला आणखी काही वेगळंच सांगणार अशा लोकांच्या संगतीमुळे तुमच्या घरात वारंवार भांडणं होऊ शकतात. यामुळे तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
