AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसच मफलरमॅन, अजितदादा प्रकरणात रोहित पवारांच्या दाव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया आली, आज जे काही…

रोहित पवार यांच्या कृत्याचा करावा तितका धिक्कार कमी आहे, असे म्हणत रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीसच मफलरमॅन, अजितदादा प्रकरणात रोहित पवारांच्या दाव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया आली, आज जे काही...
rohit pawar and devendra fadnavis and ajit pawar plane crashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 6:18 PM
Share

Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नवे दावे केले आहेत. त्यांनी आज (16 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही व्हिडीओ आणि फोटो दाखवले आहेत. रोहित पवार यांनी याआधीही अशाच काही पत्रकार परिषदा घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. सोबतच या अपघातामध्ये ज्यांच्यावर संशय उपस्थित होतोय, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असाही दावा त्यांनी केला होता. याआधीच्या पत्रकार परिषदांत अजितदादांच्या अपघाताबद्दल बोलताना एका मफलर मॅनचा उल्लेख केला होता. आता रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवून एकच खळबळ उडवून दिलीय. या फोटोने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेय. दरम्यान, रोहित पवारांच्या या दाव्यानंतर आता भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व

भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांनी दाखवलेल्या फोटोवर तसेच त्यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व आहे.आज अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा उपक्रम आहे. दुसरे काहीही नाही, असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी केला.

…त्यामुळे सार्‍याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध

तसेच रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला. केवळ रोहित सिंग याच्याशी नाही, तर अनेक वैमानिकांसोबत त्यामुळे सार्‍याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे, असेही स्पष्टीकरण बन यांनी दिले.

शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी

अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत सार्‍याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे. रोहित पवारांनी आज जे केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे, अशी बोचरी टीका नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर केली. रोहित पवार यांच्या कृत्याचा करावा तितका धिक्कार कमी आहे, असे म्हणत रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!