AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramya Krishnan : घटस्फोटाशिवाय नवऱ्यापासून वेगळी राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री; कारण सांगत म्हणाली, जेव्हाही मी…

Ramya Krishnan On Husband : दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णननं नुकत्याच एका मुलाखतीत नवऱ्यापासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं आहे.

Ramya Krishnan : घटस्फोटाशिवाय नवऱ्यापासून वेगळी राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री; कारण सांगत म्हणाली, जेव्हाही मी...
| Updated on: Nov 16, 2026 | 6:17 PM
Share

दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णन आणि तिचा पती कृष्णा वम्सी यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत होत्या. त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, अभिनेत्रीच्या एका अलीकडील वक्तव्यानं या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. रम्या कृष्णन आणि तिचा पती कृष्णा वेगळे का राहतात याचं कारण अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

नवऱ्याबद्दल काय म्हणाली रम्या कृष्णन? 

रम्या कृष्णन आणि कृष्णा वम्सी यांचं लग्न अनेक वर्षांपूर्वी झालेलं. मात्र, ते बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. कृष्णा वम्सी हैदराबादमध्ये राहतो, तर रम्या चेन्नईमध्ये राहते. अलीकडेच, रम्याने ‘रॉ टॉक्स विथ व्हीके’ (RAW Talks with VK) या पॉडकास्टवर तिच्या पतीसोबतच्या नात्याबद्दल चर्चा केली. अभिनेत्रीनं सांगितलं की, ‘आम्ही अजूनही विवाहित आहोत. आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतो. याचं कारण आमचा व्यवसाय आहे.’ टीव्ही मालिकांमध्ये काम करताना तिला हैदराबाद आणि चेन्नई दरम्यान वारंवार प्रवास करावा लागत होता, ज्यामुळे तिचा मुलगा ऋत्विकच्या आरोग्यावर परिणाम होत होता, असंही अभिनेत्री म्हणाली. रम्या म्हणाली की, ‘जेव्हाही मी शहराबाहेर जायचे, तेव्हा तो आजारी पडायचा.’

अनेक वर्षांपूर्वी, टीव्ही मालिकांमध्ये काम करत असताना, रम्या आपल्या कुटुंबासोबत हैदराबादमध्ये राहत होती. तिला कामासाठी वारंवार चेन्नईला प्रवास करावा लागत असे. शहरांमधील या सततच्या प्रवासाचा तिच्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम झाला. नंतर, रम्या आणि कृष्णा यांनी यावर चर्चा करून आपल्या मुलाला चेन्नईतील एका शाळेत घातलं आणि अभिनेत्रीसुद्धा चेन्नईला स्थायिक झाली. कृष्णा आपल्या कामासाठी हैदराबादमध्येच राहतो.

रम्या आणि कृष्णा यांचं लग्न

रम्याने पुढे सांगितलं की, ती आणि तिचा नवरा आता पूर्वीसारखे भांडत नाहीत. ते चांगले मित्र बनले आहेत. दरम्यान, रम्याला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ मधील शिवगामीच्या भूमिकेमुळे देशभरात लोकप्रियता मिळाली. तिनं 2003 मध्ये कृष्णा वम्सीशी लग्न केलं. 2005 मध्ये या जोडप्याला ऋत्विक नावाचा मुलगा झाला.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!