AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalsa Bunglow : कौटुंबिक प्रॉपर्टी वाद, अमिताभ यांच्या ‘जलसा’ बंगल्याची दुसरी बाजू, गिफ्टमध्ये मिळालेला हा बंगला अमिताभनी विकला नंतर पुन्हा..

Amitabh Bachchan Jalsa Bunglow : कौटुंबिक प्रॉपर्टीच्या वादामुळे अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला चर्चेत आला आहे. या जलसा बंगल्याबद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी फार जणांना माहित नाहीय. अमिताभ यांना हा बंगला गिफ्टमध्ये मिळालेला.

Jalsa Bunglow : कौटुंबिक प्रॉपर्टी वाद, अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्याची दुसरी बाजू, गिफ्टमध्ये मिळालेला हा बंगला अमिताभनी विकला नंतर पुन्हा..
Jalsa Bunglow
| Updated on: Nov 16, 2026 | 6:18 PM
Share

सध्या अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ यांच्या पत्नी रमोला बच्चन यांनी 1993 सालच्या एका गिफ्ट डिडला आव्हान दिलं आहे. माझ्या संमतीशिवाय ‘जलसा’ बंगला जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आला, असं रमोला बच्चन यांचं म्हणणं आहे. या संदर्भात अमिताभ यांच्या वहिनी रमोला बच्चन यांनी गेल्या सात महिन्यांत नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दिल्या आहेत. या ‘जलसा’ बंगल्याची दुसरी बाजू सुद्धा आहे ती फार कमी जणांना माहितीय. अमिताभ बच्चन यांच्या भारतात आणि परदेशात अनेक प्रॉपर्टीज आहेत. पण मुंबईच्या जुहू भागात असलेले त्यांचे दोन बंगले यांना अमिताभ यांच्या आयुष्यात विशेष स्थान आहे.

सध्या ‘जलसा’ बंगल्यात अमिताभ बच्चन यांचं वास्तव्य आहे. ‘प्रतिक्षा’ या बंगल्यात अमिताभ यांच्या अनेक आठवणी आहेत. बच्चन कुटुंब ‘प्रतिक्षा’ बंगल्यातही रहायचं. अमिताभ यांनी त्यांच्या करिअरमध्ये जे शिखर गाठलं, हे दोन्ही बंगले त्याचे साक्षीदार आहेत. ‘जलसा’ हा दोन मजली 10,125 चौरस मीटरमध्ये पसरलेला बंगला आहे. जवळपास 100 कोटीच्या घरात या बंगल्याची किंमत आहे. जलसा बंगल्यात अमिताभ त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या राहतात.

बंगला गिफ्टमध्ये का दिला?

या जलसा बंगल्याचं मूळ नाव मनसा होतं. निर्माते एनसी सिप्पी यांच्या मालकीचा हा बंगला होता. 1982 साली बॉक्स ऑफिसवर अमिताभ यांचा ‘सत्ते पे सत्ता’ तुफान हिट ठरला. एनसी सिप्पी यांचा मुलगा राज सिप्पीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘सत्ते पे सत्ता’ हिट ठरला म्हणून एनसी सिप्पी यांनी अमिताभ यांना हा बंगला गिफ्ट केला. अमिताभ यांना कामाचा मोबदला म्हणून हा बंगला गिफ्ट केला होता. अमिताभ यांनी नंतर हा बंगला विकला व जया बच्चन यांच्या आग्रहाखातर पुन्हा जास्त किंमतीला खरेदी केला. त्यावेळी ‘मनसा’ वरुन या बंगल्याचं नाव बदलून ‘जलसा’ करण्यात आलं. जया बच्चन यांच्या इच्छेखातर अमिताभ यांनी हा बंगला पुन्हा विकत घेतला.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!