AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 सप्टेंबरला UPI बंद, या बड्या बँकेकडून तातडीचा संदेश; करोडो लोकांवर होणार थेट परिणाम!

SBI UPI Service Down : तुम्ही SBI च्या UPI द्वारे दररोज पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. तुम्हाला 4 सप्टेंबरच्या रात्री काही काळ UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही.

4 सप्टेंबरला UPI बंद, या बड्या बँकेकडून तातडीचा संदेश; करोडो लोकांवर होणार थेट परिणाम!
SBI UPI Will DownImage Credit source: Google
| Updated on: Sep 02, 2026 | 6:33 PM
Share

भारतात युपीआय पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तुम्ही SBI च्या UPI द्वारे दररोज पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीच्या (मेंटेनन्स) कामामुळे 4 सप्टेंबरच्या रात्री काही काळ UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही. मात्र, या कालावधीत UPI Lite चा वापर करता येणार असल्याने छोट्या पेमेंटसाठी ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

SBI च्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12:15 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत UPI सेवा उपलब्ध राहणार नाही. म्हणजेच सुमारे 45 मिनिटे UPI सेवेवर परिणाम होणार आहे. बँकेने हेही स्पष्ट केले आहे की, देखभालीचे काम निश्चित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात ग्राहक छोट्या पेमेंटसाठी UPI Lite चा वापर करू शकतात. UPI Lite द्वारे 1,000 रुपयांपर्यंतचे छोटे व्यवहार करता येतात आणि प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते.

SBI UPI ची ट्रान्झॅक्शन लिमिट

UPI द्वारे एका दिवसात एकूण 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात. पर्सन-टू-पर्सन म्हणजेच P2P पेमेंटमध्ये दररोज 20 व्यवहार करता येतात. त्याचवेळी काही व्हेरिफाइड मर्चंट कॅटेगरीसाठी अधिक व्यवहार मर्यादा उपलब्ध आहे. इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केटसाठी ही मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत, तर IPO, टॅक्स पेमेंट, हॉस्पिटल तसेच शाळा-कॉलेजसाठी 5 लाख रुपयांपर्यंत आहे.

UPI वर MDR लागू होणार?

सरकार UPI वरील काही निवडक मर्चंट व्यवहारांवर MDR म्हणजेच Merchant Discount Rate लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अधिसूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, MDR चा दर, व्यवहाराची मर्यादा आणि इतर नियम अद्याप अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेले नाहीत.

सरकारने स्पष्ट केले आहे की, सामान्य नागरिकांकडून UPI पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. P2P व्यवहारही मोफतच राहतील. MDR लागू झाल्यास तो केवळ काही निश्चित मर्चंट व्यवहारांवर लागू होईल. सध्या UPI व्यवहारांवर MDR आकारला जात नाही.

UPI चा वापर झपाट्याने वाढला

गेल्या काही वर्षांत UPI मुळे डिजिटल पेमेंट करणे मोठ्या प्रमाणात सोपे झाले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये UPI वर सुमारे 2 कोटी व्यवहार झाले होते. ही संख्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वाढून 24,162 कोटींहून अधिक झाली. याच कालावधीत UPI व्यवहारांची एकूण रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2016-17 मध्ये व्यवहारांची एकूण किंमत 0.07 लाख कोटी रुपये होती, ती 2025-26 मध्ये वाढून सुमारे 314 लाख कोटी रुपये झाली.

Follow Us
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती