AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CDS 2 2021 : यूपीएससीकडून सीडीएस 2 चं नोटिफिकेशन जारी, 339 पदांसाठी भरती प्रक्रिया

केंद्रीय लोकसेवा आयोगानं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस 2 भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. युपीएससीच्या वेबसाईटवर या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल.

CDS 2 2021 :  यूपीएससीकडून सीडीएस 2 चं नोटिफिकेशन जारी, 339 पदांसाठी भरती प्रक्रिया
UPSC
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 04, 2021 | 1:13 PM
Share

CDS 2021 नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस 2 भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. युपीएससीच्या वेबसाईटवर या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. नोटिफिकेशन पाहण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत 24 ऑगस्ट 2021 आहे. एकूण 339 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 4 ऑगस्ट अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख : 24 ऑगस्ट सीडीएसचा अर्ज मागं घेण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर सीडीएस परीक्षेची तारीख : 14 नोव्हेंबर

अर्ज दाखल कसा करायचा?

स्टेप 1 : यूपीएससीची वेबसाईट upsconline.nic.in ला भेट द्या . स्टेप 2 : सीडीएस 2 भरतीच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : सीडीएस 2021 साठी नोंदणी करा. स्टेप 4 : नोंदणीसाठी सर्व माहिती नोंद करा. स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा. स्टेप 6 : अर्जाचं शुल्क भरुन अर्ज सादर करा.

पात्रता:

आयएमए अँड ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे. इंडियन नावल अॅकडमीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण असलं पाहिजे. एअर फोर्स अकॅडमीसाठी अभियांत्रिकीतील पदवीसह बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणं आवश्यक आहे. उमेदवारांचं वय 19 वर्षे ते 25 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया

यूपीएससीतर्फे 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांचा एसएसबीतर्फे घेण्यात होणाऱ्या मुलाखतीला सामोरं जावं लागेल.

पदांचा तपशील

इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून : 100 जागा इंडियन नावल अकॅडमी, एझिमाला : 22 जागा एअर फोर्स अकॅडमी, हैदराबाद: 32 जागा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई: 169 जागा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई (महिला) : 16

परीक्षा फी

महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना परीक्षेसाठी शुल्क भरावं लागणार नाही. इतर प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावं लागेल.

सीडीएस परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा

इतर बातम्या:

Kamika Ekadashi 2021 : आषाढीला बंदी, कामिका एकादशीला धमाका, पंढरपुरात एकाच दिवसात 50 हजार भाविकांची गर्दी

Maratha Reservation : मोदी सरकारचा मुळावर घाव, थेट 102 व्या घटनादुरुस्ती कायद्यात बदल करणार!

CDS 2 2021 Exam UPSC released notification today apply online at upsconline nic in check details here

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली