बँकेत नोकरी करण्याची इच्छाय? 8 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

IBPS RRB 2022 : एकूण 8 हजार 81 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सात जून रोजी या भरतीची जाहिरात द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे

बँकेत नोकरी करण्याची इच्छाय? 8 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
कामाची बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 12:05 PM

बँकेत (Bank Jobs 2022) काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे. 8 हजार पेक्षा जास्त जागांसाठी बँकत पदभरती केली जाणार आहे. यासाठी आयबीपीएसकडून (IBPS RRB 2022) बँकेच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरआरबी अंतर्गत बँक अधिकारी आणि कनिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी आता अर्ज मागवण्यात आले आहे. एकूण 8 हजार 81 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आज (सात जून रोजी) या भरतीची जाहिरात द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीद्वारे स्थानिक ग्रामीण  बँकमध्ये (Region Rural Bank) वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाणार आहे. यामुळे अनेकांना बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे.

कोणत्या पदासाठी नेमक्या किती जागा?

  1. आयबीपीएस आरआरबी ऑफिस असिस्टंट – 4483 posts
  2. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल 1 – 2676 posts
  3. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल 2- 842 posts
  4. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल 3 – 80 posts
  5. हे सुद्धा वाचा

कोणत्या पदासाठी वयाची काय अट?

  1. ऑफिसर स्केल-3 – 21-40 years
  2. ऑफिसर स्केल-2 – 21-32 years
  3. ऑफिसर स्केल-1 18 -30 years
  4. ऑफिस असिस्टंट (मल्टिपरपज)- 18-28 years

अर्जाची फी किती?

एससी, एसटी आणि पीडब्लूबीडीसाठी 175 रुपयांत या पदांसाठी अर्ज भरता येईल. तर ओपन कॅटेगिरीतील लोकांना अर्ज भरण्यासाठी 850 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

महत्त्वाची अट

ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करुन इच्छिणारे उमेदवार व्यवस्थापक पदासाठीही अर्ज करु शकतात. तर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्यांना फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येऊ शकेल.

महत्त्वपूर्ण तारखा

या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असू 26 जूनपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. तर 27 जून ही अर्जाची रक्कम भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. दरम्यान, या भरतीसाठी ऑगस्ट महिन्यात परीक्षा पार पडेल. सगळ्यात आधी ऑगस्टमध्ये प्रिलिमनरी परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होईल. यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये ऑनलाईन पद्धतीनं अंतिम परीक्षा घेतली जाईल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.