AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICAR Recruitment 2022: आयसीएआरमध्ये 641 पदांसाठी भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

भारतीय शेती संशोधन परिषद (आयसीएआर) ने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विविध ठिकाणावरील तंत्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे

ICAR Recruitment 2022: आयसीएआरमध्ये 641 पदांसाठी भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 18, 2021 | 2:55 PM
Share

ICAR recruitment 2022 नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय शेती संशोधन परिषद (ICAR) ने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विविध ठिकाणावरील तंत्रज्ञ पदासाठी ( Iari Technician Recruitment 2022) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट nbri.res.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करावेत.

641 पदांसाठी भरती

आयसीएआरनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 286 खुला प्रवर्ग, ओबीसी 133, ईडब्ल्यूएस 61 आणि एससी साठी 93, एसटी साठी 68 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आयसीएआरनं या जागांमध्ये बदल केला जाऊ शकतो, असं कळवलं आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत

आयसीएआरमध्ये तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर कोणत्याही कारणासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर, विद्यार्थ्यांना परीक्षा आणि अर्जाचं शुल्क 100 रुपये द्यावं लागेल. तर, शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करावं लागेल.

पात्रता:

आयसीएआर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी परीक्षा असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेमध्ये विहीत सूट दिली जाते.

बार्टीतर्फे प्रशिक्षण अभियानासाठी अर्ज करण्याचं आवाहन

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 22 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आलं आहे. तर, 26 डिसेंबरला लेखी परीक्षा होणार आहे.

इतर बातम्या

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

ICAR invites application for technician 641 post check details here

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष