AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFCAT Recruitment 2022: भारतीय हवाई दलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; 317 जागांवर भरती

भारतीय हवाई दलानं सामान्य प्रवेश परीक्षा ( Air Force Common Admission Test 2022) साठी 317 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

AFCAT Recruitment 2022: भारतीय हवाई दलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; 317 जागांवर भरती
Jobs
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 29, 2021 | 7:00 AM
Share

AFCAT Recruitment 2022: नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं सामान्य प्रवेश परीक्षा ( Air Force Common Admission Test 2022) साठी 317 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय हवाई दलाच्या नोटिफिकेशननुसार कमिशन्ड ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या https://careerindianariforce.cdac.in/ किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 1 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्याच्या दरम्यान आहे. भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार एकूण कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 317 पदांवर भरती होणार आहे. यामध्ये अफकॅट एन्ट्रीद्वारे फ्लायिंग साठी 77 जागा, ग्राऊंड ड्यटीच्या 129, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी 111 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता

इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यटी टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 50 टक्के गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा. तर, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

इंडियन एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा फ्लाईंग ब्रांच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 199 ते जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. तर ग्राऊंड ड्युटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. AFCAT एन्ट्रीसाठी 250 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.

संबंधित बातम्या:

लहान मुलाचे सुपर क्यूट एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस बनून जाईल, व्हिडीओ नक्का पाहा

अर्जुन खोतकरांवरची कारवाई शिवसैनिकांच्या जिव्हारी, जालन्यात ED च्या मदतीने शिवसेनेचा ‘गेम’ केल्याची भावना

Indian Air Force AFCAT 2022 recruitment for 317 post check here for details here

Follow Us
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...