AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haizil Jebi pilot story : इंजिनिअरिंगच्या 20 विषयात नापास, केली झोमॅटोची नोकरी, आज थेट पायलट, तरुणाची यशोगाथा वाचून डोळ्यात येईल पाणी!

इंजिनीअरिंगमध्ये २० विषयांत बॅकलॉग, त्यानंतर डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हर म्हणून काम केलं. अनेक संकटांचा सामना करत केरळच्या हॅझिलने पायलट ट्रेनिंग सुरू केलं. आज हॅझिल जेबी पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Haizil Jebi pilot story : इंजिनिअरिंगच्या 20 विषयात नापास, केली झोमॅटोची नोकरी, आज थेट पायलट, तरुणाची यशोगाथा वाचून डोळ्यात येईल पाणी!
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 17, 2026 | 10:13 PM
Share

अभ्यासात बॅकलॉग लागले, नोकरी गेली, घरची जबाबदारी अंगावर पडली आणि वडिलही साथ सोडून गेले. एकामागून एक संकट येत असतानाही केरळच्या हॅझिल जेबीने पायलट होण्याचं स्वप्न उराशी घट्ट धरून ठेवलं. वेळ आली तेव्हा कधी झोमॅटो डिलिव्हरी, कधी गणिताची शिकवणी, तर केव्हा ट्रक आणि बसही चालवली. तोच तरूण आज त्याच स्वप्न पूर्ण करत आहे. वयाच्या 30 व्या वर्षी पायलट होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्यात यशस्वी झाला आहे.

इंजिनीअरिंगमध्ये 20 विषयांत बॅकलॉग

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर येथे हॅझिलचा जन्म झाला. त्याला लहानरपणापासून पायलट व्हायचे होते. लहानपणातच उंच आकाशात झेप घेण्याचे स्वप्न मनाशी घट्ट धरून ठेवले होते.मात्र कुटुंबाच्या परिस्थितीमुळे त्याने विमानाशी संबंधित अभ्यासक्रमाऐवजी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण या गोष्टींत त्याच मन रमलं नाही. परिणामी त्याला तब्बल 20 विषयांत बॅकलॉग लागले. पण आपल्या कुटुंबाकडे पाहून त्याने मेहनत घेऊन सर्व विषय पूर्ण केले आणि इंजिनिअरिंगची पदवी अखेर मिळवली

कधी डिलिव्हरी बॉय तर कधी शिकवणी घेतली

पदवीचा निकाल लागण्याची वाट पाहत असताना,हॅझिलने आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी कोचीमध्ये झोमॅटो पार्टनर म्हणून काम सुरू केले. त्यानंतर बंगळूरूच्या बायजूज या शैक्षणिक कंपनीत गणिताचा शिक्षक म्हणूनही काम केलं. पायलट होण्याच स्वप्न अंधूक होत असताना त्याने इतर ठिकाणी देखील प्रयत्न केले. वयाच्या 27 व्या वर्षी भारतीय सैन्यदल आणि तटरक्षक दलात जाण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. मात्र अंतिम निवड यादीपर्यंत पोहोचण्यात त्याला यश आले नाही. त्याच दरम्यान हॅझिलची बायजूज मधील नोकरीही गेली. त्यामुळे नाईलाजाने घरखर्च भागवण्यासाठी दिवसरात्र ट्रक आणि बसही त्याने चालवले

वडिलांच निधन, पण स्वप्न सोडलं नाही

कोरोना काळात हॅझिलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटक आला. त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी मोठा मुलगा म्हणून हॅझिलवर आली. अचानक त्याचा आधार निघून गेल्याने हॅझिल प्रचंड खचला. आर्थिक अडचणींमुळे हॅझिलला पायलट होण्याचे स्वप्न काही काळ विसराव लागलं.

नोकरी सांभाळत कुटुंबाची जबाबदारी उचलत.त्याने अनेक ठिकाणी शिक्षणासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर त्याला कर्ज मंजूर झालं आणि हॅझिल फिलिपिन्सला गेला. हॅझिलच्या स्वप्नाना बळ मिळालं तिथे त्याने फास्ट एव्हिशन अकॅडमीमध्ये पायलट प्रशिक्षण अखेर सुरू केलं.पण हॅझिलचा प्रवास इथे संपलेला नाही. पायलट प्रशिक्षण पूर्ण करणं आणि एखाद्या विमान कंपनीत नोकरी मिळवणं हे वेगवेगळे टप्पे आहेत. हॅझिल म्हणाला की मागे वळून पाहताना संयम आणि आत्मविश्वासाने त्यांना कठीण काळात टिकून राहण्यास मदत केली. लोकांशी वाद घालण्याऐवजी मी माझ्या कृतीतून त्यांना प्रतिसाद दिला.आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले,आणि म्हणूनच आज मी इथे उभा आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट