सरकारी नोकरी करण्याची संधी, ‘या’ विभागात बंपर भरती, परीक्षेचे नो टेन्शन, थेट होणार निवड…

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये.

सरकारी नोकरी करण्याची संधी, या विभागात बंपर भरती, परीक्षेचे नो टेन्शन, थेट होणार निवड...
| Updated on: Feb 01, 2024 | 1:36 PM

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. थेट राज्य शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. थेट पाटबंधारे विभागामध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये.

पाटबंधारे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट पद्धतीने उमेदवाराची निवड ही या भरती प्रक्रियेसाठी केली जाईल. चला तर मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 29 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया सेवा करार आणि परिश्रमिक तत्वावर होणार आहे.

एकून दहा पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांना आपली सर्व माहिती, कागदपत्रे, मोबाईल नंबर, ईमेल हे कार्यकारी अभियंता नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग, वैजापूर या पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे.

आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवरून मुलाखतीसाठी संपर्क साधला जाईल. मुलाखतीला येताना उमेदवारांना आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहवे लागणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. चला तर मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही एक मोठी संधी नक्कीच आहे.