Nashik | नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटी कारंज्यात अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक फुलसजावट
नाशिकमधील पंचवटी कारंजा सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील चौकाचौकांत भगवे झेंडे आणि पताकांनी परिसर सजवण्यात आला असून ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील पंचवटी कारंजा सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांनी सजलेला पुतळा भाविकांचे लक्ष वेधून घेत असून परिसरात भक्तिभाव आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काल मध्यरात्री शिवगर्जनेसह छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. आज दिवसभर शहरभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...

