PSCB Recruitment 2021 : वरिष्ठ व्यवस्थापक ते क्लर्कची नोकरी मिळवण्याची संधी, 856 पदांसाठी व्हॅकन्सी

| Updated on: Apr 30, 2021 | 2:38 PM

पंजाबमध्ये सरकारी नोकरीची एक मोठी संधी समोर आली आहे. पंजाब राज्य सहकारी बँक लिमिटेडने (PSCB Recruitment 2021) वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपीक-कम-डाटा एंट्री ऑपरेटर आणि स्टेनो टायपिस्ट या पदांसाठी एकूण 856 जागा काढल्या आहेत.

PSCB Recruitment 2021 : वरिष्ठ व्यवस्थापक ते क्लर्कची नोकरी मिळवण्याची संधी, 856 पदांसाठी व्हॅकन्सी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

PSCB Recruitment 2021 : मुंबई : पंजाबमध्ये सरकारी नोकरीची एक मोठी संधी समोर आली आहे. पंजाब राज्य सहकारी बँक लिमिटेडने (PSCB Recruitment 2021) वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपीक-कम-डाटा एंट्री ऑपरेटर आणि स्टेनो टायपिस्ट या पदांसाठी एकूण 856 जागा काढल्या आहेत. यासाठी पीएससीबीने अधिसूचना देखील जारी केली आहे (PSCB Recruitment 2021 Vacancy For Many Posts Apply Here).

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पंजाब राज्य सहकारी बँक लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाईट pscb.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात (PSCB Recruitment 2021) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 20 मे 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

या पदांवर भरती होईल

क्लर्क कम डेटा ऑपरेटर (Clerk cum Data Operator) – 739

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – 40

व्यवस्थापक (Manager) – 60

आयटी अधिकारी (IT Officer) – 07

स्टेनोग्राफर टायपिस्ट (Stenographer Typist) – 10

पगाराचा तपशील

लिपिक कम डेटा ऑपरेटर – 19900

वरिष्ठ व्यवस्थापक – 35,400

व्यवस्थापक – 29,200

आयटी अधिकारी – 25,500

स्टेनो टायपिस्ट – 21,700

अर्ज कोण करु शकेल?

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे कमीतकमी सेकेंड डिव्हीजनसह पदवी (कोणत्याही विषयात) किंवा पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयात) असणे आवश्यक आहे. यासह संगणकात किमान सहा महिन्याचा डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, दहावीपर्यंत पंजाबी भाषा विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 37 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणाखाली येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये पाच वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

कशी होईल निवड?

या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही मुलाखत होणार नाही. स्टेनो टायपिस्ट पदासाठी पंजाबी आणि इंग्रजी शॉर्टहँड कौशल्य चाचणी देखील घेण्यात येणार आहे. तेच फक्त पात्र ठरतील.

PSCB Recruitment 2021 Vacancy For Many Posts Apply Here

संबंधित बातम्या :

India Post GDS Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी बंपर भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

CA Foundation June Exam 2021: आयसीएआयचा मोठा निर्णय, सीए फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा