AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Post GDS Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी बंपर भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. Maharashtra Postal circle recruitment

India Post GDS Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी बंपर भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 28, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई: भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://appost.in/gdsonline/ वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल. (Maharashtra Postal circle GDS and BPM recruitment for 2428 post click here for full details)

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर 27 एप्रिल ते 26 मे या दरम्यान अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

2428 जागांसाठी भरती

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.

पगार

ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 12000 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार मिळेल.

आरक्षणनिहाय जागा

खुला प्रवर्ग-1105, एसटी- 244, एससी -191, ओबीसी- 565, ईडब्ल्यूएस 246, दिव्यांग- 77 जागांवर भरती होणार आहे.

अर्ज कसा करायचा?

टपाल विभागाच्या भर्ती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. यानंतर, उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

India Post GDS Recruitment 2021: भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज

(Maharashtra Postal circle GDS and BPM recruitment for 2428 post click here for full details)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?