India Post GDS Recruitment 2021: भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज

इंडिया पोस्ट छत्तीसगड सर्कलमध्ये पोस्टल सर्व्हर किंवा ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजरच्या 1137 पदांवर बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. (Bumper Recruitment in Indian Post Department, Candidates who have passed 10th can apply)

India Post GDS Recruitment 2021: भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 4:59 PM

नवी दिल्ली : जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. इंडिया पोस्ट छत्तीसगड सर्कलमध्ये पोस्टल सर्व्हर किंवा ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजरच्या 1137 पदांवर बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट भरती 2021 मध्ये दहावी पास उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही, परंतु शॉर्टलिस्टेड उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी करुन प्रशिक्षणासाठी बोलवले जाईल. संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करा. (Bumper Recruitment in Indian Post Department, Candidates who have passed 10th can apply)

लक्षात ठेवा या तारखा

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 मार्च 2021 रोजी सुरु होईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटी मुदत 7 एप्रिल 2021 रोजी असेल. अर्जाचे शुल्क भरण्याची तारीख 7 एप्रिल 2021 असेल.

1137 जागांसाठी भरती – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 1137 जागांसाठी भरती आहे.

शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल.

वयोमर्यादा आणि शुल्क – या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.

किती पगार – ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 12000 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

टपाल विभागाच्या भर्ती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. यानंतर, उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल. (Bumper Recruitment in Indian Post Department, Candidates who have passed 10th can apply)

इतर बातम्या

FCI Manager Final Result 2021: मॅनेजर भरती परीक्षेचा अंतिम निकाल जारी, असा करा चेक निकाल

सचिन वाझेंनी दोन गोष्टी लपवल्या, एक- गुन्ह्यातील गाडी तेच वापरत होते, दुसरी… : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.