सचिन वाझेंनी दोन गोष्टी लपवल्या, एक- गुन्ह्यातील गाडी तेच वापरत होते, दुसरी… : देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरने (Mansukh Hiren) यांची हत्याच झाली आहे. यामध्ये सचिन वाझे यांचा हात असल्याचं दिसतंय. मात्र सचिन वाझेंना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार एडी-चोटी एक करत आहेत, पूर्ण ताकद लावत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सचिन वाझेंनी दोन गोष्टी लपवल्या, एक- गुन्ह्यातील गाडी तेच वापरत होते, दुसरी... : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis_Sachin Vaze
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 4:36 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे (API Sachin Vaze) यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. “मनसुख हिरने (Mansukh Hiren) यांची हत्याच झाली आहे. यामध्ये सचिन वाझे यांचा हात असल्याचं दिसतंय. मात्र सचिन वाझेंना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार एडी-चोटी एक करत आहेत, पूर्ण ताकद लावत आहेत. सचिन वाझे नेमकी कोणाकोणाची नावं घेतो याच्या भीतीने ठाकरे सरकार वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. (API Sachin Waze hide two things in Mansukh Hiren death case claim Devendra Fadnavis)

सचिन वाझे हे API आहेत. त्यांना वाचवण्यासाठी इतका फोर्स का लावताय?  सचिन वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत का? विरोधी पक्षनेत्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा घाबरणारा विरोधी पक्षनेता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जी इनोव्हा गाडी होती, ती मुंबईतच आहे, त्या गाडीची माहिती मिळाल्यास, मी माधमांसमोर घेऊन येईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

आज सभागृहात मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. यामध्ये धक्क्दायाक घटना आहेत. मनसुख यांची गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबर पासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. इतकंच नाही तर याप्रकरणाचा तपास केवळ सचिन वाझेंनी केला. तीन दिवस ते रोज सचिन वाझेंसोबत जायचे आणि यायचे. माध्यमांनी मनसुख हिरेन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं, स्वत: सचिन वाझे यांना वकिलांकडे देऊन पाठवायला लावलं. एव्हढंच नाही सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा मी बाहेर काढतो, माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असा जबाब पत्नीने दिला आहे.

सचिन वाझेंनी दोन गोष्टी लपवल्या

मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ते गावडे हे २०१७ च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केलं होतं. या दोघांना बेल मिळाली आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, सरळसरळ अर्थ असा आहे, त्यांची हत्या झाली आहे. एव्हढे पुरावे असताना, आमची मागणी एकच होती, सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे प्रमुख आहे. त्यांना पुरावे नष्ट करण्याचे रिसोर्सेस आहेत. त्यामुळे त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गाडी क्राईममध्ये वापरली आहे ती गाडी चार महिने त्यांच्याकडे सचिन वाझेंकडे होती हे त्यांनी लपवलं आणि मनसुख हिरेनला ओळखत होते हे लपवले, त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील, मात्र आयपीसी 201 अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी होती.

पण आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, तेव्हा गृहमंत्र्यांनी कबुल केलं त्याला हटवण्याचं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याबाबत बदलले. सचिन वाझेला पदावरुन दूर करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे सरकार पाठिशी घालत आहे. याचं कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठिमागे कोण कोण आहे, सचिन वाझे कोणा कोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार पाठिशी घालत आहे. यामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत. हे सरकार पूर्णपणे उघडं पडलं आहे.

VIDEO : देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

(API Sachin Waze hide two things in Mansukh Hiren death case claim Devendra Fadnavis)

संबंधित बातम्या 

Mansukh Hiren death : भर सभागृहात चिरफाड, देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शब्द, जसाच्या तसा!

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.