AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेला सीडीआर आणि मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे खासदार मोहन डेलकर प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?
| Updated on: Mar 09, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी मनसुख हिरेन प्रकरणावर तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेला सीडीआर आणि मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे खासदार मोहन डेलकर प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ घातला.(Devendra Fadnavis and Anil Deshmukh face to face over Mansukh Hiren case)

सभागृहात नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही त्यांनी वाचून दाखवली आणि डेलकर यांना महाराष्ट्र सरकारवर विश्वास होता, म्हणून त्यांनी महाराष्ट्रात, मुंबईत येऊन आत्महत्या केल्याचं देशमुखांनी सांगितलं. इतकच नाही तर मध्यप्रदेशातील एका IAS अधिकाऱ्याने अशीच एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा मुद्दाही देशमुखांनी उपस्थित केला. त्यानंतर मोहन डेलकर प्रकरणाची चौकशी आपण SIT कडे सोपवत असल्याची घोषणाही केली.\

‘पुरावे नष्ट करण्यासाठी मुभा देताय का?’

देशमुखांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केल्यावर जोरदार आक्षेप नोंदवला. अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्राची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत आहात का? लोकांना महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहात का? असा सवाल फडणवीसांनी विचारला. इतकच नाही तर एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही किती आटापिटा करणार आहात, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. गृहमंत्र्यांनी डेलकरांच्या पक्षाचा उल्लेख केला. पण त्यांना वाझेंनी कुठल्या पक्षात प्रवेश केला होता, हे दिसलं नाही. सचिन वाझे आजही अधिकारपदावर आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता सरकार सांगत असेल की आम्ही चौकशी करु, तर तुम्ही त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी मुभा देत आहात, असा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. या प्रकरणात सरकारचा खरा चेहरा दिसत असल्याची टीकाही फडणवीसांनी केलाय.

सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी

सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे समोर आले आहेत. पण त्यांनी कुण्या एका पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने असं केलं तर काळ त्यांना माफ करणार नाही. त्यामुळे सचिन वाझे यांना आधी निलंबित करा, अशी जोरदार मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर सचिन वाझे यांना पोलीस खात्यात पुन्हा कशाप्रकारे घेण्यात आलं त्याबाबतचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तेव्हा पॉईंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित करत देशमुखांनी आक्षेप घेत हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचं देशमुखांनी म्हटलं.

आता गृहमंत्र्यांवरच शंका- फडणवीस

देशमुखांनी उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ ऑर्डरला उत्तर देताना हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर आता तुमच्यावरच शंका उपस्थित होत असल्याची टीकाही फडणवीसांनी केलीय.

‘होय, मी सीडीआर मिळवळा, करा चौकशी’

गृहमंत्री आणि फडणवीसांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी फडणवीसांकडे असलेल्या सीडीआरचा उल्लेख केला. सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी केली. पटोले यांच्या मागणीवर आक्रमक होत फडणवीसांनी होय मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. हे मला धमकी देत आहेत काय? पण आधी ज्याने हत्या केली त्याला तरी पकडा, असं थेट आव्हान फडणवीसांनी पटोले यांना दिलं. सरकार जर खुन्याला पाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पलिकडे जाऊन पुरावे मिळवण्याची आपली क्षमता असल्याचं आव्हानही फडणवीसांनी गृहमंत्र्यांना दिलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis and Anil Deshmukh face to face over Mansukh Hiren case

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.