VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले. (sachin waze killed my husband, mansukh hiren's wife claim, says devendra fadnavis)

भीमराव गवळी

|

Mar 09, 2021 | 12:53 PM

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. (sachin waze killed my husband, mansukh hiren’s wife claim, says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

फडणवीस काय म्हणाले?

मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे २०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे.

हा जो मनसुख हिरेन आहे. यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्याठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?

अध्यक्ष महोदय, 201 खाली सचिन वाझेंना अटक का झाली नाही? ३०२ चं सोडून द्या. मला राजकारण नको. ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी देणंघेणं नाही. कोण वाचवतंय, आणि कशासाठी वाचवतंय. आम्हाला संशय आहे, मनसुख हिरेन यांची हत्या गाडीमध्ये करण्यात आली. गावडेंच्या एरियात करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. यांची चूक कुठे झाली, यांना वाटलं हाय टाईड आहे. बॉडी परत आली नसते, लो टाईड होती, म्हणून परत आली. 302 च होत राहिल. तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे.

अनिल परब काय म्हणाले?

ज्या माणसाचा मृत्यू झाला त्यासंदर्भात आवाज उठवला ही चांगली गोष्ट आहे. खासदार मोहन डेलकरांनी आत्महत्या केलीय, त्या मोहन डेलकरांना सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं लिहलीय, त्यांनाही अटक झाली पाहिजे. जो कायदा सचिन वाझेंच्या बाबतीत आहे, तोच कायदा मोहन डेलकरांच्या बाबतीत हवा. महाराष्ट्रात न्याय मिळणार की नाही महत्त्वाचे. आमची देखील मागणी मोहन डेलकरांच्या आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. (sachin waze killed my husband, mansukh hiren’s wife claim, says devendra fadnavis)

डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नेत्यांचे नाव नाही

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं फडणवीस म्हणाले. (sachin waze killed my husband, mansukh hiren’s wife claim, says devendra fadnavis)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra budget session day 7 Live | देवेंद्र फडणवीसांकडून सचिन वाझेंच्या अटकेची मागणी

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन प्रकरणी ATS ची धक्कादायक थेअरी, कोड्यात टाकणारे 5 मुद्दे

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

(sachin waze killed my husband, mansukh hiren’s wife claim, says devendra fadnavis)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें