AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FCI Manager Final Result 2021: मॅनेजर भरती परीक्षेचा अंतिम निकाल जारी, असा करा चेक निकाल

एफसीआयकडून मॅनेजर (जनरल), मॅनेजर (डेपो), मॅनेजर (मुव्हमेंट), मॅनेजर (अकाउंट्स), मॅनेजर (टेक्निकल), मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) अशा एकूण 330 पदांसाठी भरती करावयाची आहे. (the final result of the manager recruitment exam is released, do the check result)

FCI Manager Final Result 2021: मॅनेजर भरती परीक्षेचा अंतिम निकाल जारी, असा करा चेक निकाल
एफसीआय मॅनेजर भरती परीक्षेचा अंतिम निकाल जारी
| Updated on: Mar 09, 2021 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)ने घेतलेल्या मॅनेजर भरती परीक्षेचा अंतिम निकाल (FCI Manager Final Result 2021) जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत, या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट fci.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. वेगवेगळ्या झोननुसार वेगवेगळे निकाल देण्यात आले आहेत. या भरती परीक्षेची अधिसूचना 26 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाली होती. एफसीआयकडून मॅनेजर (जनरल), मॅनेजर (डेपो), मॅनेजर (मुव्हमेंट), मॅनेजर (अकाउंट्स), मॅनेजर (टेक्निकल), मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) अशा एकूण 330 पदांसाठी भरती करावयाची आहे. या पदांसाठी फेज 2 चा निकाल 01 जुलै 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. (the final result of the manager recruitment exam is released, do the check result)

झोननुसार निकाल जारी

या भरतीसाठी वेगवेगळ्या झोनमध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालही वेगवेगळ्या झोननुसार जारी केले गेले आहेत. परिणामी अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले गेले आहेत. उमेदवारांची झोननिहाय निवड यादी fci.gov.in वर अपलोड केली गेली आहे. एफसीआय मॅनेजर 2021 फेज 2 ची परीक्षा 23 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली आणि कागदपत्र पडताळणी पूर्व विभागासाठी 14 ते 17 डिसेंबर 2020 पर्यंत, पश्चिम विभागासाठी 22 आणि 23 डिसेंबर 2020, उत्तर पूर्व विभागासाठी 16 आणि 17 डिसेंबर 2020, दक्षिण विभागासाठी 14 ते 18 डिसेंबर 2020 या काळात आणि उत्तर विभागासाठी 14 ते 19 डिसेंबर 2020 आणि 21 ते 24 डिसेंबर 2020 या कालावधीत करण्यात आली.

रिक्त पदे

या भरती प्रक्रियेद्वारा मॅनेजर (जनरल), मॅनेजर (डेपो), मॅनेजर (मुव्हमेंट), मॅनेजर (अकाउंट्स), मॅनेजर (टेक्निकल), मॅनेजर (सिव्हिल इंजिनीअरिंग), मॅनेजर (हिंदी) आणि मॅनेजर (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पदांवर भरती समाविष्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या झोनसाठी वेगवेगळ्या जागा निश्चित केल्या आहेत. पूर्व विभागात 37 जागा, उत्तर विभागात 187, पश्चिम विभागात 15, दक्षिण विभागात 65 आणि उत्तर-पूर्व विभागातील 26 जागांवर निर्णय घेण्यात आला आहे.

झोननिहाय निकाल डाऊनलोड कसा कराल?

– अधिकृत वेबसाईट.fci.gov.in वर जा. – मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या सध्याच्या भरती विभागावर क्लिक करा. – त्यानंतर कॅटेगरी 2 वर क्लिक करा. – आपल्या झोनवर क्लिक करा. – एफसीआय मॅनेजर अंतिम निकाल 2021 मुख्यपृष्ठावर दिसेल. – ‘To check the Final Exam Results in reference to Advt.No.02/2019-FCI Cat-II’ या लिंकवर क्लिक करा. – पीडीएफ ओपन होईल. मग ती डाऊनलोड करा. (the final result of the manager recruitment exam is released, do the check result)

इतर बातम्या

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून कामाचे तास, सुट्ट्या, पेन्शन आणि पीएफमध्ये बदल होणार, जाणून घ्या

Tarini | तारिणीच्या ‘त्या’ 6 धाडसी महिलांची कथा रुपेरी पडद्यावर, केंद्रीय मंत्र्याची लेक झळकणार मुख्य भूमिकेत!

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...