AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SBI Clerk Recruitment

SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत  5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार
स्टेट बँक ऑफ इंडिया
| Updated on: Apr 27, 2021 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. ( SBI Clerk Recruitment 2021 notification released for five thousand vacancies junior associates know details here)

अर्ज कुठे करायचा?

स्टेट बँकेच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी उमेदवार 17 मेपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in, bank.sbi/careers या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

पात्रता:

ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 20 वर्ष ते 28 वर्षांदरम्यान असणं गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया:

ज्युनिअर असोसिएटस पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करताना उमेदवार जी प्रादेशिक भाषा निवडतील त्या भाषेमध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल. पूर्व परीक्षा 1 तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 100 प्रश्न असतील. ही परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि 0.25 गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.

परीक्षा फी

ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

पगार

स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएटस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजार 900 ते 47 हजार 920 पगार मिळेल. उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.

संबंधित बातम्या:

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, 69 हजारांपर्यत पगार मिळणार

(SBI Clerk Recruitment 2021 notification released for five thousand vacancies junior associates know details here)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.