AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, 69 हजारांपर्यत पगार मिळणार

भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. Indian Navy SSR AA Recruitment

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, 69 हजारांपर्यत पगार मिळणार
भारतीय नौदलात नोकरीची संधी
| Updated on: Apr 26, 2021 | 10:51 AM
Share

Indian Navy SSR AA Recruitment 2021:नवी दिल्ली: भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  5 मे 2021 हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या दहावी, बारावी आणि शैक्षणिक गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी बनवली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षा 23 जुलै रोजी होणार आहे. (Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts registration starts from today click here for details)

पदांचा तपशील

आर्टिफिसर अप्रेंटिस नाविक (Sailor AA) – 500 पदे

सेकंडरी रिक्रूट नाविक (Sailor SSR) – 2000 पदे

एकूण पदांची संख्या – 2500

भारतीय नौदलाची फेसबुक पोस्ट

पात्रता:

भारत सरकार/राज्य सरकार द्वारा मान्यताप्राप्त शाळा/बोर्डाकडून12 वी विज्ञान शाखेचीपरीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 12वी मॅथ्स, फीजिक्स विषय अभ्यासलेला असणं आवश्यक आहे. यासोबत बारावीमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कंप्यूटर सायन्स यापैकी एका विषयाचा देखील समावेश असावा, आर्टिफीसर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना दहावीच्या परीक्षेला कमीत कमी 60 टक्के गुण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा नेमकी किती?

भारतीय नौदलातालील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

वेतन किती मिळणार?

सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 एप्रिल पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.

Indian Navy SSR AA Recruitment 2021:इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी भरती, 69 हजारांपर्यंत पगार, वाचा सविस्तर

Vikas Bank PO recruitment 2021: विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

(Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts registration starts from today click here for details)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.