Vikas Bank PO recruitment 2021: विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. Vikas Bank PO Recruitment 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:29 PM, 23 Apr 2021
Vikas Bank PO recruitment 2021: विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
सरकारी नोकरी

Vikas Bank PO recruitment 2021:नवी दिल्ली: बँकेत नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली बातमी आहे. विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदावर भरती प्रक्रिया सुरु आहे. विकास सौहार्द को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटवर जाऊन प्रोबेशनरी पदासाठी अर्ज करता येईल. प्रोबेशनरी पदासाठी अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. (Vikas Bank Probationary Officer recruitment application last day today know details)

अर्ज कुठे करायचा?

विकास सौहार्द को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटवर जाऊन प्रोबेशनरी पदासाठी अर्ज करता येईल. विकास बँकेच्या https://www.vikasbank.com/career.html या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा येईल. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु इच्छितात ते पदवीधर असणं आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक: 23 एप्रिल
परीक्षा शुल्क जमा करण्याचा दिनांक : 23 एप्रिल
परीक्षेचा दिनांक : 25 एप्रिल
मुलाखतीचा दिनांक : 1 मे

पात्रता:

विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. भारतातील कोणत्याही भारत सरकार आणि राज्य सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीला 50 टक्के पेक्षा जास्त गुणं मिळवलेले असणं आवश्यक आहे. तर वयाची अट 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

विकास बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं टेस्ट आयोजित करेल. ऑनलाईन टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची 1 मे रोजी मुलाखत घेण्यात येईल.

भारतीय नौदलात 2500 जागांवर भरती

भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 26 एप्रिल 2021 पासून होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 26 एप्रिल 2021 पासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत 5 मे 2021 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या दहावी, बारावी आणि शैक्षणिक गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी बनवली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षा 23 जुलै रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या:

शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश

Indian Navy SSR AA Recruitment 2021:इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी भरती, 69 हजारांपर्यंत पगार, वाचा सविस्तर

(Vikas Bank Probationary Officer recruitment application last day today know details)