AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2026 : 4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची 30 चेंडूत मोठी खेळी

MPL 2026 Rajat Patidar : रजत पाटीदार याच्या नेतृत्वात ग्वालियर चित्ता टीमने सलग दुसरा विजय साकारला आहे. ग्वालियर टीमने यासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

MPL 2026 : 4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची 30 चेंडूत मोठी खेळी
Rajat Patidar MPLImage Credit source: MPL
| Updated on: Jun 07, 2026 | 10:54 PM
Share

रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी केलं. आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. रजत यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा याच्यानंतर टीमला आपल्या नेतृत्वात सलग 2 ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतने नेतृत्वासह बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे रजतची आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तसं झालं नाही. मात्र त्यानंतरही रजतमधील धावा करण्याची भूक कायम असल्याचं पाहायला मिळालं.

ग्वालियर चित्ताचा सलग दुसरा विजय

रजत आयपीएलनंतर आता मध्यप्रदेशमध्ये एमपीएल 2026 स्पर्धेत खेळत आहे. रजत या स्पर्धेत ग्वालियर चित्ता संघाचं नेतृत्व करत आहे. रजतने 7 जून रोजी मालवा स्टॅलिअन्स विरुद्ध सामन्यातील पहिल्या डावात वादळी खेळी साकारली. रजतने केलेल्या खेळीच्या जोरावर ग्वालियर चित्ताने मालवा स्टॅलिअन्ससमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रजतच्या टीमने मालवा स्टॅलिअन्सला 17.1 ओव्हरमध्ये 139 रन्सवर ऑलआऊट केलं. अशाप्रकारे रजतच्या संघाने हा सामना 51 धावांच्या फरकाने जिंकला. रजतने केलेली खेळी ही ग्वालियर चित्ताच्या विजयात निर्णायक ठरली. रजतला त्याने केलेल्या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं.

रजतची बॅटिंग

रजतने त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. रजतने 30 बॉलमध्ये 216.67 च्या स्ट्राईक रेटने 65 रन्स केल्या. रजतने या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. रजत व्यतिरिक्त मंगेश यादव याने फिनिशिंग टच दिला. आयपीएल स्पर्धेत आरसीबीसाठी खेळणाऱ्या रजतने 17 चेंडूत 1 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या.

मालवा स्टॅलिअन्सचं पराभव

रजत आणि मंगेश या दोघांनी केलेल्या खेळीमुळे मालवा स्टॅलिअन्सला विजयासाठी 191 धावांचं आव्हान मिळालं. मात्र या विजयी धावांचा पाठलाग करताना ओपनिंग जोडीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 20 हा आकडा गाठता आला नाही. मालवा स्टॅलिअन्ससाठी राकेश ठाकुर याने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर अंश यादव याने 30 रन्स केल्या. तर रजतच्या टीममधील गोलंदाजांनी इतर फलंदाजांना झटपट गुंडाळून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि सामना जिंकला.

ग्वालियर चित्तासाठी इशान अफ्रिदी आणि सौम्य पांडे या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर आकाश रघुवंशी आणि मंगेश यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करण्यात योगदान दिलं.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात