AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळ, राणांचा पत्ताकट, या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळ, राणांचा पत्ताकट, या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी जाहीर
Rajendra Jain NCP CandidateImage Credit source: Google
| Updated on: Jun 07, 2026 | 10:33 PM
Share

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी उत्सुक होते, मात्र आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे.

राजेंद्र जैन महायुतीचे उमेदवार – तटकरे

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे यांनी म्हटले की, राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे उमेदवार असतील. भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी 12 वर्षे प्रतिनिधित्व केलेले आहे. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम केलं आहे. विदर्भातून संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं, त्यामुळे एकमताने त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.

छगन भुजबळही होते आग्रही

छगन भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते. याबाबत प्रश्न विचारला असता तटकरे यांनी सांगितले की, ‘याबाबत आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब 1999 सालपासून सोबत आहेत. दादांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांचेही निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान होणार आहे. आगामी काळात त्यांचा सन्मान करण्यात येईल.’ यावेळी छगन भुजबळही उपस्थित होते, मात्र ते एक शब्दही न बोलता निघून गेले.

भुजबळांनी घातली होती अट

समोर आलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही होते. मात्र राज्यसभेवर गेल्यावर आपला पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा होती. मात्र समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींकडून नकार आल्याची माहिती समोर आली होती. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांना मंत्री केले तरच राज्यसभेवर जाणार असल्याची अट घातल्याने तिढा वाढला होता. मात्र आता राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात