AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात

Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात

| Updated on: Sep 07, 2026 | 2:59 PM
Share

अमरावती जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सप्टेंबर महिना सोयाबीनसाठी महत्त्वाचा असताना पुरेसा पाऊस नसल्याने वाढ खुंटली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, शेतकऱ्यांनी लावलेल्या लाखोंच्या गुंतवणुकीवर पाणी फिरले आहे. रब्बी पिकेही घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या सप्टेंबर महिना सुरू असतानाही, अमरावती जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. विदर्भात उन्हाळ्यासारखी परिस्थिती असून, खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबर महिना सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, मात्र अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पिकाने माना टाकायला सुरुवात केली आहे.

पावसाची अनियमितता आणि अल निनोचा प्रभाव यामुळे जमिनीतील ओल पूर्णपणे तुटली आहे. सूर्य आग ओकल्याने आणि पाणी नसल्याने सोयाबीन करपण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठाही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अपर वर्धा धरणात गतवर्षी ९५% पाणी होते, ते यावर्षी ५३-५५% पर्यंत घटले आहे. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर आणि रब्बी हंगामातील पिकांवरही होणार आहे. गहू आणि हरभऱ्यासारखी रब्बी पिके कशी घ्यावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. लाखो रुपये खर्च करून फुलवलेली शेती पावसाअभावी हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.

 

 

Published on: Sep 07, 2026 02:59 PM

Follow Us