सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नवनीत राणा यांच्या नावाबाबत आता पक्षामध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांचा विषय आमच्या पक्षा तर्फे संपला आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. पक्षाच्या निर्णयांवर बाहेरून भाष्य करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: Jun 07, 2026 04:14 PM
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच

