Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरणाच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुखरूप सुटका करण्यात आली.
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरणाच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही आरोपींनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांना आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा वेगाने पाठलाग करत आरोपींना अडवले. या थरारक कारवाईदरम्यान अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेचा तसेच पाठलाग करून चालाखीने आरोपींना पकडण्यचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.
Published on: Jun 07, 2026 05:36 PM
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे

