AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना

एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्… थरकाप उडवणारी घटना

| Updated on: Jun 07, 2026 | 3:08 PM
Share

मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ. किशोर डांगे यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले डॉ. किशोर डांगे हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

फिर्यादीनुसार, एका खाजगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीची गुप्तपणे प्रसूती करण्यात आली. त्यानंतर जन्मलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच बालकाची विक्री केल्याचाही आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

या प्रकरणात दोन नामवंत डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध POCSO आणि बेकायदेशीर प्रसूतीसंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: Jun 07, 2026 03:06 PM

Follow Us