AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई

इराणसोबत अमेरिकेची चर्चा सुरू असतानाच इस्त्रायलकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. हा अमेरिकेसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. इस्त्रायलच्या या हल्ल्यामुळे आता इराणसोबतची चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई
इस्त्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 10:12 PM
Share

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजची सामुद्रधुनी बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान अशी देखील एक बातमी समोर येत होती की इराणने अमेरिकेसोबत सर्व प्रकारची चर्चा बंद केली होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये जेव्हा युद्धविराम झाला होता, तेव्हा त्यामध्ये ही देखील एक प्रमुख अट होती की, इस्त्रायल लेबनॉनवर हल्ला करणार नाही, परंतु तरी देखील इस्त्रायलकडून लेबनॉवर हल्ले सुरूच असल्यामुळे इराण नाराज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन करून चांगलंच सुनावलं होतं.

16 एप्रिल रोजी लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आला होता. मात्र आता मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इस्त्रायलकडून लेबनॉनच्या राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा युद्धविराम देखील तुटला आहे. इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं.हिजबुल्लाहच्या अड्ड्यांवर इस्त्रायलकडू जोरदार हल्ला करण्यात आला आहे. हा अमेरिकेला देखील मोठा धक्का मानला जात आहे, इस्त्रायलकडून लेबनॉवर सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांनी नेतन्याहू यांना लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांवरून इशारा दिला होता, त्यानंतर पुन्हा एकदा इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ला करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे 16 एप्रिल रोजी लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आला होता. या युद्धविरामानंतर इस्त्रायलकडून पहिल्यांदा लेबनॉनच्या राजधानीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आता अमेरिकेची इराणसोबत सुरू असलेली चर्चा देखील फिसकटण्याची शक्यता आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप