महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 7 जूनपासून नव्या दरांची अंमलबजावणी केली आहे. यापूर्वी एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 7 जूनपासून नव्या दरांची अंमलबजावणी केली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता तीन महिन्यांनी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.
नवीन दरानुसार 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत नवी दिल्लीमध्ये 942 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 941.50 रुपये इतका आहे. तर हैदराबादमध्ये ग्राहकांना 994 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकाता येथे सिलेंडरचा दर 968 रुपये आहे. इतर महानगरांच्या तुलनेत बंगळुरुमध्ये एलपीजी सिलेंडरचा दर काहीसा कमी असून तो 915.50 रुपये आहे.
दरवाढीमुळे गृहिणींमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आधीच महागाईमुळे घरखर्च वाढला असताना आता गॅस सिलेंडर महागल्याने महिलांचे मासिक बजेट कोलमडले आहे. अनेक कुटुंबांनी सरकारने दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.
Published on: Jun 07, 2026 02:03 PM
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय

