Railway Job Recruitment : 3 हजार 548 पदांकरिता रेल्वेत मेगा भरती, लगेचच करा अर्ज, थेट संधी..

Railway Job Recruitment : रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. विशेष केंद्र सरकारची नोकरी करण्याचे अनेक फायदे असतात. त्यातच रेल्वे विभागात बंपर भरती राबवली जात आहे. विविध पदांकरिता ही भरती प्रक्रिया आहे.

Railway Job Recruitment : 3 हजार 548 पदांकरिता रेल्वेत मेगा भरती, लगेचच करा अर्ज, थेट संधी..
Railway Job Recruitment
| Updated on: Oct 16, 2026 | 10:14 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची, वयाची अट ठेवण्यात आली. केंद्र सरकारीची नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरतीकरिता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. रेल्वेकडून ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट पदानुसार ठरवण्यात आली. चिफ कमर्शियल सुपरवाझर एकून पदे 127 (RPB मुंबई पदे CR-7, WR-6, अहमदाबाद ह-7) तर गुड्स मॅनेजर एकून पदे 2,750 (RRB मुंबई CR-79, SCR-2) (RRB -अहमदाबाद हफ 14) ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टापपिस्ट एकून पदे- 300, सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट एकून पदे 371.

याकरिता पात्रता उमेदवार पदवीधारक असावा. यासोबतच सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी संगणकारवर हिंदी, इंग्लिश टायपिंग प्रोफिशियन्सी अनिवार्य आहे. यात वयाची वयोमर्यादा ही 18 ते 33 वर्ष असावी. त्यात शासकीय नियमाप्रमाणे वयाच्या अटीमध्ये शिथिलता देण्यात आली. याकरिता काही परीक्षा रेल्वे विभागाकडून घेतल्या जातील.

Loading...

कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या शंकासाठी ईमेल rrb.help@csc.gov.in यावर संपर्क करू शकता. यासोबतच 9592001188, 01725653333 संपर्क करू शकता. विद्यार्थी या बंपर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. याकरिता www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर 8 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

रेल्वेकडून गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. निवड पद्धती- स्टेज एक कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट जनरल अवेअरनेस-40 प्रश्न, मॅथेमॅटिक्स-30 प्रश्न, जनरल इंटलिजन्स रिझनिंग-30 प्रश्न एकून 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाईल. 90 मिनिटात 100 प्रश्नांची उत्तरे आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. स्टेज 2 मध्ये जनरल अवेअरनेस 50 प्रश्न, मॅथेमॅटिक्स 35, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 35 प्रश्न, एकून प्रश्न 120 आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us