AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Mains 2021 : यूपीएससीकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, upsc.gov.in वर DAF जारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मु्ख्य परीक्षा 7 ते 9 जानेवारी आणि 15 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल.

UPSC Mains 2021 : यूपीएससीकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, upsc.gov.in वर DAF जारी
यूपीएससी
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 24, 2021 | 9:46 AM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मु्ख्य परीक्षा 7 ते 9 जानेवारी आणि 15 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात नोटिफिकेशन वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे. तर, मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारा डीएफ जारी करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तो यूपीएसचीच्या वेबसाईटवर भरावा लागणार आहे.

दोन टप्प्यात परीक्षा

7 जानेवारीला पेपर क्रमांक 1, 8 जानेवारीला जनरल स्टडीज पेपर क्रमांक 1, जनरल स्टडीज पेपर क्रमांक 2 आणि 9 जानेवारीला जनरल स्टडीज पेपर क्रमांक 3 आणि जनरल स्टडीज पेपर क्रमांक 4 होणार आहे. तर 15 जानेवारीला भारतीय भाषा, इंग्रजी आणि 16 जानेवारीला वैकल्पिक विषयांचे दोन पेपर होणार आहेत.

वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

DAF अर्ज सादर करण्यासाठी इथं क्लिक करा

डीएफ 1 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन

जे विद्यार्थी किंवा उमेदवार नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मुख्य परीक्षेसाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाला यूपीएससीकडून डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म-1 असं म्हटलं जाते. डीएफमध्ये विद्यार्थ्यांना जन्म तारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज अपलोड कराव्या लागतात. मुख्य परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आलेलं शुल्क देखील विद्यार्थ्यांना भरावं लागेल. खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 200 रुपये शुल्क भरावं लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्क द्यावं लागणार नाही.

DAF म्हणजे काय?

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यावर उमेदवारांकडून अर्ज दाखल करुन घेते. पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षेसाठी डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी डीएफ-2 अर्ज सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मुलाखतीच्या अर्जात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम विचारले जातात. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांचे पर्याय उपलब्ध असतात.

DAF 22 नोव्हेंबरला जारी

यूपीएससीकडून मुख्य परीक्षेसाठी डीएएफ सादर करण्याची लिंक 22 नोव्हेंबरला अ‌ॅक्टिव्ह करण्यात आली असून ती 1 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Recruitment 2021: इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 जागांसाठी भरती, अर्ज कुठं करायचा?

Bank Recruitment 2021: सेंट्रल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

Upsc union public serive commission declared civil services mains 2021 exam dates and daf at upsc gov in

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?