AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमारतीसाठी खोदला होता खड्डा, बॉल काढण्यासाठी खड्ड्याजवळ वाकला अन्…

शाळेतून घरी येत होता. घराजवळ इमारतीच्या पुनर्बांधाकामासाठी खड्डा खोदला होता. मुलाला या खड्ड्यात बॉल दिसला. तो बॉल काढण्यासाठी खड्ड्याजवळ गेला आणि इथेच घात झाला.

इमारतीसाठी खोदला होता खड्डा, बॉल काढण्यासाठी खड्ड्याजवळ वाकला अन्...
कल्याणमध्ये खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यूImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 25, 2023 | 3:11 PM
Share

कल्याण / सुनील जाधव : इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 12 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली. कैलास नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मुलगा खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी हजर झाले. अग्नीशमन दलाने मुलाचा शोध सुरु केला. एका स्थानिक नागरिकाने अग्नीशमन दलाची मदत करत गाळात रुतलेला मुलाचा मृतदेह बाहेर काढला.

खड्ड्यातील बॉल काढण्यासाठी वाकला अन् तोल गेला

कल्याण पूर्वेत इमारतीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या जवळ असलेल्या वस्तीत मयत मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहतो. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी येत असताना त्याला या खड्ड्यात बॉल दिसला. मुलगा हा बॉल काढताना खड्ड्यात वाकला असता त्याचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला.

नागरिकांना वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला

स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गाळात रुतला. यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बोटीच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला. यावेळी एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मदतीला धाव घेत खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकाने या जागेवर असलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी इमारत तोडल्यानंतर दोन महिन्यापूर्वी हा खड्डा खोदला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हा खड्डा भरला आणि आजूबाजूची माती, कचरा जाऊन यात गाळ तयार झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा