घोरपडीचे प्रायवेट पार्ट्स विकले, तांत्रिकाचं मोठं कांड; पोलिसांनी छापा मारताच घरात सापडल्या नको त्या वस्तू

फरीदाबादमधून एक अजब बातमी समोर आली आहे. येथे एक ज्योतिषी पालीचे प्रायवेट पार्ट विकत होता. पण तो असं का करत होता, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

घोरपडीचे प्रायवेट पार्ट्स विकले, तांत्रिकाचं मोठं कांड; पोलिसांनी छापा मारताच घरात सापडल्या नको त्या वस्तू
lizard
Image Credit source: AI Image
| Updated on: Jul 19, 2025 | 7:35 PM

हे प्रकरण फरीदाबादच्या सेक्टर-8 मधील आहे. येथे आध्यात्मिक उपचारांचा व्यवसाय करणारा एक स्वयंभू ज्योतिषी प्रतिबंधित वन्यजीव अवयवांची विक्री करत होता. यामध्ये घोरपडीचे सुकलेले प्रायवेट पार्ट आणि इतर प्राण्यांचा समावेश होता. हे कथितपणे गुप्त आणि तांत्रिक विधींसाठी वापरलं जात होतं. आरोपीचं नाव यज्ञ दत्त (वय 38) असं आहे.

तांत्रिक विकत होता छिपकलीच्या जननांगांचे तीन तुकडे

हरियाणा वन विभाग, हरियाणा पोलिस, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो आणि भारतीय वन्यजीव ट्रस्ट यांच्या संयुक्त छापेमारीत हा तांत्रिक पकडला गेला. यज्ञ आपल्या ज्योतिष कार्यालयात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे या प्रतिबंधित वस्तूंची विक्री करत होता. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, त्याच्याकडून घोरपडीचे प्रायवेट पार्टचे तीन तुकडे आणि सॉफ्ट कोरलचे पाच तुकडे जप्त करण्यात आले.

वाचा: सुंदर होती मुलाची बायको, प्रेमात पडला सासरा… मुलाला कळताच जे झालं पोलिसही हादरले

10,000 रुपये दंडाची शक्यता

घोरपडीचे प्रायवेट पार्ट ही वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची I अंतर्गत येणारी प्रजाती आहे. या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी आहेत. देशात घोरपडीचे अवयव ठेवणं किंवा त्यांचा व्यापार करणं हा दंडनीय गुन्हा आहे. दोषी आढळल्यास आरोपीला तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, न्यायालय 10,000 रुपये दंडही ठोठावू शकतं.

पुढील तपास सुरू

विक्रेते आणि खरेदीदारांची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. गुरुग्रामचे प्रभागीय वन अधिकारी आरके जांगडा यांनी सांगितलं की, ही घटना कठोर देखरेखीची गरज दर्शवते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)