नाशिक मध्यवर्ती ठिकाणी सुरू होता कुंटणखाना, कशाच्या आडून केला जात होता देहव्यापार? पोलिसही चक्रावले…

योग वेलनेस स्पा येथून सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. मसाज पार्लरच्या आडून केला जाणारा हा व्यवसाय सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक मध्यवर्ती ठिकाणी सुरू होता कुंटणखाना, कशाच्या आडून केला जात होता देहव्यापार? पोलिसही चक्रावले...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2023 | 3:49 PM

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शोध पथकाने मोठी ( Nashik Police ) कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून कारवाईची उलटसुलट दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नाशिक शरणपुर रोडवरील सुयोजीत मॉर्डन पॉईट या इमारतीमध्ये मसाज पार्लरच्या आडून कुंटणखाना सुरू होता. योग वेलनेस स्पा ( Masaage Parler ) या नावाने हे मसाज पार्लर सुरू होते त्या तेथून सहा महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. शहराच्या मध्यवर्ती राजरोसपणे हा कुंटणखाना कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता. स्थानिक पोलिसांचे यामध्ये काही हितसंबंध होते का? अशा विविध चर्चा सुरू झाल्या आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची बाब समोर आल्याने मसाज पार्लर मोठ्या चर्चेत आले आहे. खरंतर मसाज पार्लर सुरू करून त्याच्या आडून केला जाणारा देहव्यापार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेला हा देहव्यापार समोर आल्याने मसाज पार्लर चालवणाऱ्या महिला आणि गाळा मालक यांच्यासह पाच जणांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सुनील माळी या पोलिस अधिकाऱ्यांना शरणपुर रोड येथील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत छापा टाकला होता.

योग वेलनेस स्पा येथून सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. मसाज पार्लरच्या आडून केला जाणारा हा व्यवसाय सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संशयित महिला आणि ललित पांडुरंग राठोड यांना पोलिसांनी गजाआड केले असून इतर संशयित आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहे. त्यामुळे इतर संशयित आरोपींचा शोध लागल्यानंतर कारवाईत काय समोर येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.