AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA : यूएसए विरुद्ध टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यातून आऊट, संजूला डच्चू

India vs USA Icc WC 2026 Toss : टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात 2 प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागलं आहे. तर संजू सॅमसन याला डच्चू देण्यात आला आहे.

IND vs USA : यूएसए विरुद्ध टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यातून आऊट, संजूला डच्चू
IND vs USA Toss And Playing 11Image Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 07, 2026 | 8:49 PM
Share

टीम इंडियाला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला आहे. टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल याने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला या निमित्ताने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे विस्फोटक फलंदाज भारताला किती धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाला मोठा झटका

टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यात तब्येत बरी नसल्याने मुकावं लागलं आहे. बुमराहची तब्येत चांगली नसणं हे मोहम्मद सिराज याच्या पथ्यावर पडलं. बुमराहच्या जागी सिराजचा समावेश करण्यात आलाय. सिराजला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या जागी संधी देण्यात आली आहे. हर्षितला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय.

सुंदरचा दुखापतीसह संघर्ष सुरुच

तसेच ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे सुंदरला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय. सुंदरला न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. सुंदर तेव्हापासून दुखापतीसोबत लढतोय. त्यामुळे सुंदर दुसऱ्या सामन्यापर्यंत फिट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ओपनर संजू सॅमसन याला डच्चू

तसेच टीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला अपेक्षेप्रमाणे डच्चू देण्यात आला आहे. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत घोर निराशा केलेली. त्यामुळे संजूला डच्चू मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं, अखेर या ओपनरसह तसंच झालंय.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्ती

यूएसए प्लेइंग ईलेव्हन : अँड्रिज गॉस (विकेटकीपर), साईतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्क्विक, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना