AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षापूर्वी पत्नीने आपले जीवन संपवले, आता जवळच्या व्यक्तीनेच पतीला संपवले; कारण काय?

आमेर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना शनिवारी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास दिल्ली हायवेवर एक मृतदेह पडलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह सीएचसी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला.

तीन वर्षापूर्वी पत्नीने आपले जीवन संपवले, आता जवळच्या व्यक्तीनेच पतीला संपवले; कारण काय?
आई आणि मुलांचा संशयास्पद मृ्तयूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 27, 2023 | 5:56 PM
Share

जयपूर : आईनेच पोटच्या गोळ्याला संपवल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली आहे. दारुच्या नशेत मुलगा घरी खूप त्रास द्यायचा म्हणून आईनेच भाडेकरुंच्या मदतीने मुलाला संपवल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाती मृत्यूचा बनाव केला. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या लहान भावाच्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून, तिची अधिक चौकशी करत आहेत. या हत्येत मदत करणाऱ्या अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांना मध्यरात्रीच्या सुमारास हायवेवर आढळला मृतदेह

आमेर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना शनिवारी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास दिल्ली हायवेवर एक मृतदेह पडलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह सीएचसी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना मयताचे नाव कमलेश यादव असल्याचे कळले. तसेच, वीजेचा शॉक लागल्याने तो छतावरुन खाली कोसळल्याची माहिती मिळाली.

तीन वर्षापूर्वी पत्नीची आत्महत्या

कमलेश इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. तीन वर्षापूर्वी कमलेशच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सध्या तो आपली आई, दोन मुले आणि भाऊ-बहिण यांच्यासोबत राहत होता. कमलेशला दारुचे व्यसन होते. दारु पिऊन तो घरच्यांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला घरचे वैतागले होते. यामुळे आईनेच त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

हत्या करुन मृतदेह हायवेवर फेकला

आईने कुंडाजवळ भाडेकरुंच्या मदतीने एका फॅक्टरीमध्ये मुलाची हत्या केली. हत्या केल्यानंतर अपघाती मृत्यू भासवण्यासाठी मृतदेह 3 किमी दूर हायवेवर फेकला. मात्र कानून के हाथ लंबे होते है असं म्हणतात ना. तसेच झाले. तपासादरम्यान पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. आणि पोलिसांनी सखोल तपास सुरु केला.

तपासात आईनेच मुलाच्या त्रासाला कंटाळून त्याला संपवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?