AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूल नाही म्हणून मुलगी दत्तक घेतली, मग चिमुकलीसोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही !

दोघेही पती-पत्नी डॉक्टर. पण दाम्पत्याला मूल नव्हते. यामुळे त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण निःसंतान असलेल्या दाम्पत्याने मुलीला प्रेम देण्याऐवजी तिच्यासोबत जे केले ते पाहून अंगावर काटा येईल.

मूल नाही म्हणून मुलगी दत्तक घेतली, मग चिमुकलीसोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही !
दत्तक मुलीसोबत डॉक्टर दाम्पत्याचे हैवानी कृत्यImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 08, 2023 | 11:26 PM
Share

गुवाहाटी : डॉक्टरला देव म्हटले जाते. मात्र आजच्या कलियुगामध्ये दुर्दैवाने काही डॉक्टर हे देवाऐवजी राक्षस बनले आहेत. गुवाहाटीमध्ये उघडकीस आलेल्या घटनेतून या कटू सत्याची प्रचिती आली आहे. विशेष म्हणजे नवरा-बायको हे दोघेही डॉक्टर असून त्यांनी दत्तक घेतलेल्या लहान मुलीसोबत वारंवार अत्यंत निर्दयी आणि क्रूर कृत्य केले. डॉक्टर दांपत्याने मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटने चटके दिले, तसेच तिचे दोन्ही हात बांधून छतावर भर उन्हामध्ये उभे केले. निःसंतान दांपत्य ही समाजातील ओळख बदलण्यासाठी मुलगी दत्तक घेतली खरी, मात्र तिला प्रेम देण्याऐवजी तिचा विविध प्रकारे शारीरिक छळ केला. मुलीच्या गंभीर छळवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात डॉक्टर दांपत्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे. वलीउल इस्लाम आणि संगीता दत्ता अशी आरोपी डॉक्टर पती-पत्नीची नावे आहेत.

डॉक्टर पती अटकेत; पत्नी फरार

मुलीच्या छळवणुकीप्रकरणी आसाम पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत डॉक्टर दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मात्र पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच डॉक्टरची पत्नी संगीता दत्ता हिने अन्यत्र पळ काढला आहे. आरोपी वलीउल इस्लाम याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगीता हिला फरार होण्याकामी मदत करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वलीउल हा मनसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने आणि पत्नी संगीता या दोघांनी पीडित मुलीला घराच्या छतावर भर उन्हामध्ये हात बांधून उभे करून ठेवले होते. डॉक्टर दांपत्य दत्तक घेतलेल्या मुलीचा नियमित छळ करत होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मुलीच्या छळवणुकीप्रकरणी शेजारील व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर दांपत्याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली.

मुलीच्या अंगावर गंभीर दुखापती

डॉक्टर दांपत्याने केलेली मारहाण तसेच सिगारेटने दिलेले चटके यामुळे अल्पवयीन मुलीच्या अंगावर गंभीर दुखापती झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. डॉक्टर दांपत्याने अल्पवयीन मुलीला रोमा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर एका खोलीमध्ये बंद करून ठेवले होते. याचदरम्यान मुलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देण्यात आले.

वैद्यकीय तपासणी दरम्यान मुलीच्या गुप्तांगालाही सिगारेटचे चटके दिल्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत आढळली. डॉक्टर दांपत्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे या प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा आणि डीजीपी जी. पी. सिंह हेदेखील गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.

Follow Us
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....